Sai Tamhankar : ‘दौलतराव सापडला’ सई ताम्हणकरची ‘ती’ पाेस्‍ट चर्चेत …

‘दौलतराव सापडला’ सई ताम्हणकरची ‘ती’ पाेस्‍ट चर्चेत …
Sai Tamhankar
Sai Tamhankar : ‘दौलतराव सापडला’ सई ताम्हणकरची ‘ती’ पाेस्‍ट चर्चेत …Sai Tamhankar
Published on
Updated on

पुढारी आॉनलाईन डेस्क : बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिच्‍या एका पाेस्‍टमुळे चाहते सरप्राईज झाले आहेत. सईने आपली 'खास' गोष्ट सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर केली आहे.

Sai Tamhankar दौलतराव सापडला

(Sai Tamhankar) सई ताम्हणकर कोणत्या ना कोणत्या कारणांनी नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खास गोष्ट म्हणजे 'प्रेम'. तिने फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. या फोटोला तिने 'दौलतराव सापडला' असा हॅशटॅग दिला आहे. तो फोटो आहे निर्माता अनिश जोग याच्‍या. काही दिवसांपासून अनिश आणि ती रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. तिच्या या फोटोंवर कलाकारांसह चाहत्यांनी कॉमेंटचा वर्षाव केला आहे. श्रावन… माशी… हर्ष… मानशी… हिरवळ दाटे चोहीकडे!!!! अशी कॉमेंट अभिनेता हेमंत ढोमेने केली आहे तर प्रिया बापट म्हणतेय क्या बात हैं फायनली..!

सई जेवढी बोल्ड अभिनय करते तशी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बोल्ड आहे. तिने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. तिने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. विवीध चित्रपट, वेब सीरिजमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका केल्या आहेत. सईला 'इंटरनेट मूव्ही डाटाबेस'च्या (आयएमडीबी) 'बेस्ट ऑफ २०२१' यादीत मानाचं स्थान मिळालं आहे.

नुकतीच आयएमडीबीनं भारतीय चित्रपट आणि सीरीजमधल्या दहा सर्वोत्तम कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये सईला स्थान मिळालं हाेतं. सईने यावर्षी 'समांतर', 'नवरसा', पॉंडेचेरी आणि 'मिमी या चित्रपटात अभिनय केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news