

अलीकडेच दशावतार या मराठी सिनेमाचा ट्रेलरसमोर आला. कोकणातल्या पार्श्वभूमीवर बनलेला हा सिनेमा ट्रेलरपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतो आहे. रहस्य, ड्रामा आणि पारंपरेची जोड असलेला हा सिनेमा कोकणातील दशावतार या प्रथेच्या आसपास फिरतो हे वेगळे सांगायला नको. या सिनेमाचाय पोस्टर सगळ्यात आधी उत्सुकता निर्माण केली होती. (Latest Entertainment News)
ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्यात भरच पडली आहे. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतात नेटीझन्सनी त्याला मराठी कांतारा असे नवे नावही दिले. जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात एकदम सरप्राइज पॅकेज म्हणून समोर आले आहेत. त्यांचा हटके लुक आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेपेक्षा वेगळा आहे.
तुम्हाला माहिती आहे का या सिनेमातील दिलीप प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेसाठी निर्मात्यांची निवड सुपरस्टार रजनीकांत होते. या सिनेमाची ऑफर त्यांना केली होती. पण आधीच्या बिझी तारखा, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण असल्याने त्यांनी या सिनेमाला नकार दिला. यानंतर ही भूमिका दिलीप प्रभावळकर यांना ऑफर केली गेली.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर हे कलाकार दिसणार आहेत.
दिलीप प्रभावळकर या सिनेमात दशावतारी कलाकाराची भूमिका साकारत आहेत. आयुष्यातल्या शेवटच्या दशावताराचे सोंग घेण्यासाठी सज्ज असलेला बाबूली. कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार'.
हा सिनेमा 12 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.