जॅकलीनच्या चाहत्यांना फ्रीमध्ये मिळणार iPhone 15 Pro! महाठग सुकेश चंद्रशेखरची घोषणा

अभिनेत्रीच्या वाढदिवसाला विजेत्यांची नावे जाहीर होणार
jacqueline fernandez sukesh chandrasekhar
महाठग सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांना iPhone मोफत वितरित करणार आहे. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar : 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात असणारा महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. तो जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांना iPhone 15 Pro मोफत वितरित करणार आहे. सुकेशने तुरुंगातून अभिनेत्रीला एक पत्र लिहिले असून त्यात त्याने ही घोषणा केली आहे. या पत्रात सुकेशने 'तौबा तौबा' गाण्याचाही उल्लेख केला आहे.

जॅकलिनसाठी लिहिलेले पत्र

वृत्तानुसार, सुकेशने जॅकलीनच्या 'किक' चित्रपटातील हँगओव्हर या गाण्याचा संदर्भ देत पत्र लिहिले आहे. त्याने म्हटलंय की, ‘माझी बोमा जॅकलीन.. बेबी गर्ल.. मी खूप उत्साही आहे. तुझ्या वाढदिवसाला 30 दिवस उरले आहेत. थांबू शकत नाही. हा माझा वर्षातील सर्वात आवडता दिवस आहे. तुझे गोड हास्य पाहणे हा मला आनंद देणारा एक उत्सव आहे.’

'हँगओव्हर' गाण्याचा उल्लेख

सुकेशने पुढे लिहिलंय की, मी तुझ्यासाठी 'हँगओव्हर'मध्ये आहे. तुझे बोलणे, हसणे, मिठी मारणे, तुझे माझ्यावरचे प्रेम, यांमुळे तुझ्यावरचा राग काही सेकंदात नाहीसा होतो. तुझे डोळे, सर्वकाही, एक हँगओव्हर आहे आणि हा एक हँगओव्हर आहे जो माझ्या उर्वरित आयुष्यासाठी राहील. जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा मला हा हँगओव्हर हवा आहे आणि ही खूप छान भावना आहे. बेबी ही फक्त काही दिवसांची बाब आहे, मी सर्व आरोपांपासून मुक्त होईन.’

‘चाहत्यांना iPhone 15 Pro देईन’

याच पत्रात जॅकलिनच्या चाहत्यांना संदेश देताना सुकेश म्हणतो, जो कोणी आजपासून 30 दिवस जॅकलिनच्या ‘यिम्मी यिम्मी’ या व्हिडिओ गाण्याला पसंत करेल, त्याला गिफ्ट मिळेल. गाण्याला पसंत करणाऱ्या 100 विजेत्यांना iPhone 15 Pro दिला जाईल. माझ्या बेबी जॅकलिनच्या वाढदिवसाला विजेत्यांची नावे जाहीर केली जातील.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news