Miss India Worldwide Dhruvi Patel | ध्रुवी पटेल 'मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४' ची विजेती

कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमची विद्यार्थीनी बनली 'मिस इंडिया वर्ल्डवाईड'
Miss India Worldwide Dhruvi Patel
ध्रुवी पटेल 'मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४' ची विजेती ठरली आहे Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४ ची विजेती एक कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमची विद्यार्थीनी ठरली आहे. तिचे नाव ध्रुवी पटेल आहे.

कोण आहे मिस इंडिया वर्ल्डवाईड ध्रुवी पटेल?

मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४ चा किताब आपल्या नावाने करणारी ध्रुवी पटेल अमेरिकेत कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन कोर्सची विद्यार्थीनी आहे. ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४ चा मुकुट आपल्या नावे केला आहे. तिने सांगितले की, या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तिला कसा प्रवास करावा लागला.

ध्रुवी पटेल म्हणाली - इथेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. हा किताब जिंकणे खरंच सन्मानाची बाब आहे. ती म्हणाली की, लोकांना यामुळे खूप प्रेरणा मिळते. ध्रुवी पटेलने इच्छा व्यक्त केली की, तिला एक सक्सेसफुल बॉलीवूड अभिनेत्री बनायचे आहे. तसेच युनिसेफची राजदूत बनण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४ चे कंटेस्टेंट्स

मिस इंडिया वर्ल्डवाईड २०२४ ची रनरअप सूरीनामची लिसा अब्दोएलहक ठरली. तर नेदरलँडची मालविका शर्मा दुसरी रनर-अप बनली. मिसेस कॅटेगिरीमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुआन मौटेट विजेत्या ठरल्या. स्नेहा नांबियार पहिली आणि युनायटेड किंग्डमची पवनदीप कौर दुसरी रनर-अप ठरली.

टीन कॅटेगिरीमध्ये ग्वाडेलोपची सिएरा सुरेटला 'मिस टीन इंडिया वर्ल्डवाईड' किताब जिंकला. नेदरलँडची श्रेया सिंह आणि सूरीनामची श्रद्धा टेडजोला पहिली आणि दुसरी रनर-अप म्हणून घोषित केले.

मिस इंडिया वर्ल्डवाईड काय आहे?

मिस इंडिया वर्ल्डवाईड कॉम्पिटिशन भारताच्या बाहेर होणाऱ्या सर्वात दीर्घकाळ चालणारी स्पर्धा आहे. ही स्पर्धा न्यूयॉर्क येथील इंडिया फेस्टिव्हल कमिटी आयोजित करते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news