

comedian sunil pal sudden weight loss netizens shocked looks unrecognizable in slippers at kis kisko pyaar karun 2 screening
पुढारी ऑनलाईन :
प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील पाल अलीकडेच कपिल शर्माच्या ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होते. मात्र त्यांना पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य आणणाऱ्या कलाकाराला चेहऱ्यावर मात आज निराशा दिसत होती. सुनील पाल यांच्या पायात साधारणशी चप्पल, अंगात साधी पँट-शर्ट आणि डोक्यावर जुनी टोपी होती. त्यांचे वजनही खूपच घटलेले दिसत होते. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोक विचारू लागले की, त्यांना नेमके झालेय तरी काय?
कॉमेडियन सुनील पाल यांची प्रचंड लोकप्रियता होती
एक काळ असा होता की, कॉमेडियन सुनील पाल यांची प्रचंड लोकप्रियता होती. राजू श्रीवास्तव आणि एहसान कुरैशी यांसारख्या कॉमेडियनसोबत सुनील पाल यांची कॉमेडीही प्रेक्षकांना खूप आवडायची. त्यांनी मोठे नाव आणि प्रसिद्धी कमावली होती. मात्र अलीकडेच ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रीमियरमध्ये ते दिसले, तेव्हा त्यांची अवस्था पाहून सगळेच थक्क झाले. सुनील पाल यांचे वजन खूपच घटले होते आणि त्यांनी साध्या पँट-शर्टसोबत पायात चप्पल घातल्या होत्या. त्यांना या अवस्थेत पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि युजर्स प्रतिक्रिया देऊ लागले.
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली की, सुनील पाल यांनी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत इतके काम केले, चांगले पैसेही कमावले, तरी आज एखाद्या चित्रपटाच्या प्रीमियरला ते इतक्या साध्या कपड्यांत आणि चप्पल घालून का आले? त्यातच त्यांचे वजनही पूर्वीपेक्षा खूप कमी झालेले दिसत होते. ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या स्क्रीनिंगला अनेक चित्रपट व टीव्ही कलाकार झगमगत्या अवतारात दिसत होते, पण सुनील पाल आले तेव्हा त्यांची अवस्था पाहून सगळेच हैराण झाले.
सुनील पाल यांची स्थिती पाहून लोकांना वाटली कीव
सुनील पाल यांची ही अवस्था पाहून अनेक लोक निराश झाले आणि त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त करू लागले. लोकांना हसवणाऱ्या सुनील पाल यांची अशी अवस्था पाहून अनेक युजर्सचे मन हेलावले. मात्र काहींनी याला पब्लिसिटी स्टंट असल्याचेही म्हटले असून, यावरून सोशल मीडियावर वादही सुरू झाला आहे. ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या स्क्रीनिंगमधील सुनील पाल यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.
सुनील पाल इतक्या गर्दीतही उभे होते कोपऱ्यात
एका युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “सुनील पाल यांची अशी काय अवस्था झाली आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “साधी पँट-शर्ट, पायात चप्पल, डोक्यावर जुनी टोपी, चेहऱ्यावर हास्य नाही, फक्त तीच जुनी चिंता आणि निराशा. एकेकाळी हाच माणूस मंचावर येताच लोकांचे हसू आवरले जात नव्हते,
टीव्ही स्क्रीनच्या पलीकडे लाखो घरांमध्ये हास्याचे फवारे उडायचे. ‘कॉमेडी सर्कसचा सुनील पाल’ म्हणून लोक अभिमानाने ओळखायचे. आज तोच सुनील पाल कपिल शर्माच्या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये गर्दीचा भाग बनून एका कोपऱ्यात उभा होता. जणू काही पाहुणा नाही, तर फक्त एक प्रेक्षक.”