

पुढारी ऑनलाईन डेस्क - कॉमेडियन सुनील पाल मागील काही तासांपासून बेपत्ता होते. याची माहिती सुनील यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिली होती. अखेर सुनील पाल यांच्याशी पोलिसांचा संपर्क झाला असून बातचीत मध्ये त्यांनी सांगितले की, ते आज मुंबईत येतील, अशी माहिती समोर आली आहे.
सुनील पालने आपल्या करिअरमध्ये अनेक कॉमेडी शोजसाठी काम केलं असून कॉमिक टाईमिंगसाठी ते परफेक्ट समजले जातात. आपल्या विनोदाने प्रेक्षकांना तासनतास खुर्चीवर खिळवून ठेवण्याची कलादेखील त्यांच्याकडे आहे. केवळ इतकचं नाही तर सुनील पाल यांनी अभिनयात देखील नशीब आजमावलं आहे. त्यांनी 'फिर हेरा फेरी', 'अपना सपना मनी मनी', 'बॉम्बे टू गोवा', 'किक' यासारख्या चित्रपटात आणि अनेक कॉमेडी शोजमध्ये काम केलं आहे.
सुनील पाल यांना अखेरच्या वेळेस 'तेरी भाभी है पहले' मध्ये (२०१८) पाहण्यात आलं होतं. कॉमेडियन सुनील पाल 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'मध्ये (२००५) दिसले होते. स्टँडअप कॉमेडीसाठी सुनील प्रसिद्ध आहे.