

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bharti Singh Youtube Channel Hacked : कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंह एका नव्या अडचणीत सापडली आहे. तिचे यूट्यूब चॅनल हॅक झाले असून बुधवारी संध्याकाळी तिने याबाबतेची माहिती इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केली आहे. हॅकरने भारती टीव्ही नेटवर्क या आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आणि इतर तपशील बदलला आहे, असा दावाही अभिनेत्रीने केला आहे.
यूट्यूब चॅनल हॅक झाल्यानंतर भारती सिंह खूप चिंतेत आहे. तिने याला ‘गंभीर समस्या’ म्हटले असून यूट्यूब इंडियाकडून मदत मागितली आहे. भारतीचे चाहते तिला धीर धरण्याचे आवाहन करत आहेत. याशिवाय चॅनलची रिकव्हरीवरून सूचना केल्या जात आहेत.
भारतीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर लिहिलंय की, ‘आम्ही एका गंभीर समस्येचा सामना करत आहोत. YouTube वरील आमचे पॉडकास्ट चॅनल @bhartitvnetwork हॅक केले गेले आहे. आम्ही @youtubeindia ला तक्रार दिली आहे. त्यांच्यापुढे आमच्या चॅनेलचे नाव आणि व्हिडिओ बदलण्यात आल्याची समस्या मांडली आहे. कृपया आम्हाला मदत करा’, अशी विनंती तिने इन्स्टाग्रामरून केली आहे.
भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघे त्यांचे युट्युब चॅनल हॅडल करतात. ते पॉडकास्ट होस्ट करता आणि आत्तापर्यंत अनेक मोठ्या स्टार्सना त्याच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आमंत्रित केले गेले आहे. त्यांच्या चॅट शोमध्ये सुनील शेट्टी, रोहित सराफ, नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिषेक कुमार, एमी विर्क, सोनम बाजवा, रणदीप हुड्डा यांच्यासह अनेक स्टार्स सहभागी झाले आहेत.
ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजनंतर भारती प्रसिद्ध झाली. ती टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडियन आहे. कपिल शर्माच्या शोमधून भारतीला घराघरात ओळख मिळाली. डिसेंबर 2017 मध्ये तिने लेखक आणि निर्माता हर्ष लिंबाचियासोबत लग्न केले. या जोडप्याला एक मुलगाही आहे.