Citadel | 'सिटाडेल'मध्ये वरुण साकारणार गुप्तहेर

'सिटाडेल'मध्ये वरुण साकारणार गुप्तहेर
Citadel
'सिटाडेल'मध्ये वरुण धवन गुप्तहेरची भूमिका साकारणार instagram
Published on: 
Updated on: 

सिटाडेल या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय वेबसीरिज आता भारतीय रूपात निघणार असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे त्याची उत्सुकता भारतीय प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. 'सिटाडेल : हनी बनी' या नावाने ही भारतीय आवृत्ती येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याची पहिली झलक नुकतीच एका सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आली. यानिमित्ताने 'सिटाडेल'मधील प्रमुख कलाकार जोडी अभिनेता वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू हे दोघेही माध्यमांसमोर आले. या वेबसीरिजमध्ये वरुणने पहिल्यांदाच गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. (Citadel)

वरुण म्हणाला की, 'सिटाडेल हनी बनी' या वेबसीरिजमध्ये मी साकारलेले बनी हे पात्र माझ्या अन्य भूमिकांपेक्षा खूपच वेगळे आहे. गुप्तहेराची भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक वाटले. कुठलाही गुप्तहेर मग तो कोणत्याही देशाचा असला तरी तो दुहेरी आयुष्य जगत असतो. तसेच त्याची ओळख दुहेरी असते. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक पैलूला दोन बाजू असतात. एखाद्या नायकाने दुहेरी भूमिका करणे वेगळे आणि एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या बाजू साकारणे हे कठीण असते. त्यामुळे बनीची भूमिका साकारताना शारीरिक मेहनतीसह मानसिक तयारीही खूपच करावी लागली. हॉलीवूडच्या मूळ लोकप्रिय वेबमालिकेत अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने प्रमख भमिका साकारली आहे. यातील तिच्या अभिनयाचे खपच कौतक करण्यात आले आहे.(Citadel)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news