Christmas Special Movie: “डॉक्टर जी” चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर आज

आयुषमान खुराना
आयुषमान खुराना
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनुभूती कश्यप दिग्दर्शित आणि जंगली पिक्चर्स निर्मित "डॉक्टर जी"मध्ये आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह अशा एकापेक्षा एक कलाकारांच्या भूमिका आहेत. (Christmas Special Movie) एक मस्त कॉमेडी नाट्‌य असलेला हा चित्रपट डॉ. उदय गुप्ता यांच्याबद्दल असून ही भूमिका आयुषमानने सुंदर साकारली आहे. ऑर्थोपेडिक्समध्ये करिअर करण्याचे स्वप्न बाळगलेल्या उदयला अखेर गायनॉकॉलॉजीच्या जगतात प्रवेश करावा लागतो. (Christmas Special Movie)

संबंधित बातम्या –

गायनॉकॉलॉजी हे क्षेत्र सर्वसाधारणपणे स्त्रियांसाठी असल्याचे मानले जाते. त्यामुळे जेव्हा उदय त्याच्या मनाविरोधात एक गायनॉकॉलॉजिस्ट बनतो, तेव्हा त्याला ते स्वीकारण्यासाठी आणि त्यानुसार स्वतःला बनवण्यासाठी अनेक कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. त्याची आई चित्रपटात म्हणते, "बनने गया था ऑर्थो का डॉक्टर, बन गया औरतों का डॉक्टर". त्यातून मग निर्माण होते आत्मशोध, दोस्ती आणि आयुष्याच्या अनपेक्षित वळणांची मनाला भावणारी पण विनोदी कथा.

एक डॉक्टर म्हणून आपले महत्त्व जेव्हा उदयला समजायला लागते तेव्हा ह्या कथेमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण येते आणि मग अनपेक्षित मैत्री आणि आत्मशोधाचा प्रवास सुरू होतो. "डॉक्टर जी" हा केवळ एक विनोदी चित्रपट नसून हा प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा मनाला भावणारा चित्रपट आहे.

ख्रिसमस स्पेशल चित्रपट "डॉक्टर जी" टीव्हीवर प्रथमच झी सिनेमा वाहिनीवर २५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news