

Christian Group Demands Removal romantic scenes inside church
मुंबई - परम सुंदरी चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच रिलीज झाला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर स्टारर हा चित्रपट उत्तर आणि दक्षिण भारतीय कपलची प्रेमकहाणी आहे. दोन्ही विविध संस्कृतीचा मिलापदेखील चित्रपटात आहे. दुसरीकडे मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एक सीन हटवण्याची मागणी होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर एका चर्चमध्ये असतात. चर्चमध्ये सिद्धार्थ जान्हवीसोबत फ्लर्ट करताना दिसतो. त्याचबरोबर आक्षेपार्ह डायलॉग्जही ऐकू येतात. या दृश्यावर ख्रिश्चन समाजाने आक्षेप घेतला आहे. तो अनादरपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले असून निर्मात्यांनी ते चित्रपटातून काढून टाकण्याची त्यांनी मागणी केली आहे.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या परम सुंदरी या चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ख्रिश्चन समाजाच्या सदस्यांनी चर्चमध्ये कलाकारांच्या फ्लर्टिंगच्या दृश्यावर आक्षेप घेतला आणि ते हटवण्याची मागणी केली. सीबीएफसीने या दृश्याला दिलेल्या मंजुरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निर्मात्यांनी चित्रपटातून हा हे सीन्स काढून टाकले नाही तर निषेध करण्याचा इशाराही त्यांनी दिला असल्याची माहिती मिळतेय.
मीडिया रिपोर्टनुसार, एका फौंडेशनने सीबीएफसी, मुंबई पोलिस, माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून चित्रपट निर्मात्यांना चित्रपट आणि प्रमोशनल व्हिडिओजमधून हे सीन्स हटवण्यासाठी सांगितले आहे. फौंडेशनच्या वकिलाने म्हटले की, प्रेक्षकांचे अधिक लक्ष वेधण्यासाठी जे दृश्य दाखवण्यात आले आहेत, अशा गोष्टींवर अंकुश लावण्याची गरज आहे.
पत्रात म्हटले आहे की, ''चर्च हे एक पवित्र प्रार्थनास्थळ आहे आणि तिथे अश्लील गोष्टी दाखवल्या जाऊ नयेत. ही दृश्ये केवळ धार्मिक प्रार्थनास्थळाच्या आध्यात्मिक पावित्र्याचा अनादर करत नाही तर कॅथोलिक समुदायाच्या संवेदनशीलतेलाही गंभीरपणे दुखावतात.''