पुढारी ऑनलाईन
मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स (एमसीयू) मध्ये 'थॉर'ही सुपरहीरो व्यक्तिरेखा साकारणारा हॉलीवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थचे जगभरात चाहते आहेत. ख्रिसचा फिटनेस, अभिनय, लूकची दुनिया दिवानी आहे. जगभरातून अशी तगडी फॅन फॉलोविंग असलेला ख्रिस बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे इम्प्रेस झाला आहे.
एका चॅट शोमध्ये हे दोघे सहभागी झाले होते. या चर्चेत सोनाक्षीने तिच्या एका सवयीविषयी सांगितल्यावर ख्रिसला राहावले नाही. सोनाक्षी आणि ख्रिसला त्यांनी गेल्यावर्षी कुठला छंद जोपासला, असा प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा सोनाक्षी म्हणाली एम्ब्रॉयडरी. त्यावर ख्रिस उस्फूर्तपणे 'वॉव' म्हणाला.
सोनाक्षीला ही कॉम्प्लिमेंट खूप भारी वाटली. दरम्यान, ख्रिसने त्याच्या छंदाबाबत बोलताना स्कूबा डायव्हिंग असे सांगितले. आवडता सहकलाकार या प्रश्नाच्या उत्तरात सोनाक्षीने अक्षयकुमारचे नाव घेतले तर ख्रिसने अभिनेत्री केट ब्लँचेट हिचे नाव घेतले. सुट्टी घालवण्याचे आवडते ठिकाण विचारल्यावर सोनाक्षीने मालदीव सांगितले तर ख्रिसने कोस्टारिका.