

पुढारी ऑनलाईन डेस्क - विक्की कौशल - रश्मिका मंदाना पीरियड ड्रामा 'छावा'चे निर्माते चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्यासाठी सज्ज आहेत. ए आर रहमान - अरिजीत सिंह यांचे एक इमोशनल रोमँटिक ट्रॅक आहे. छावा या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा चिरंतन प्रवास दाखवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मॅडॉक फिल्म्सने इन्स्टाग्राम अकाऊंटवर छावा चित्रपटातील एका गाण्याची घोषणा केली आहे. जाने तू असे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे आज ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.
मॅडॉक फिल्म्सने इन्स्टाग्राम अखाऊंट पोस्टवर म्हटलंय - Celebrating the everlasting journey of Chhatrapati Sambhaji Maharaj and Maharani Yesubai with this eternal melody. #JaaneTu, crafted by three maestros - @arrahman @arijitsingh & @irshadkamilofficial, brings life to the eternal journey of Chhatrapati Sambhaji Maharaj and Maharani Yesubai. Song out tomorrow. #Chhaava releasing in cinemas on 14th February. @arrahman @arijitsinghSambhaji Maharaj and Maharani Yesubai. Song out tomorrow. Chhaava releasing in cinemas on 14th February. छावा १४ फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज तर साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत आहे.
टीजर शेअर करत निर्मात्यांनी लिहिलं, 'या शाश्वत संगीतासोबत छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या अनंत प्रवासाची यात्रा साजरा करत आहोत...'जाने तू. ए आर रहमान, अरिजीत सिंह आणि इरशाद कामिलद्वारा तयार करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा अनंत प्रवास जीवंत करतो. गाणे उद्या रिलीज होणार आहे. छावा १४ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.'