

पुढारी ऑनलाईन डेस्क - विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना चित्रपट छावा सिनेमागृहात (१४ फेब्रुवारी) रिलीज झाला आहे. छावाचे तिकिट ॲडव्हान्स बुकिंग झाल्याने रिलीज आधीच तुफान कमाई झाली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपट जबरदस्त कमाई करेल, असे म्हटले जात आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने छावा चित्रपटाला शानदार रिव्ह्यू दिला आहे. तुम्हाला माहितीये का, या चित्रपटातील मुख्य कलाकारांनी किती फी घेतली?
विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता यासारखे तगडे कलाकार चित्रपटात आहे. सर्वाधिक फी विक्की कौशलने घेतलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की कौशलने छावासाठी १० कोटी रुपये फी घेतलीय. अक्षय खन्नाला रश्मिका मंदाना पेक्षी कमी फी मिळालीय. अक्षय खन्नाला २ कोटी तर रश्मिका मंदाला ४ कोटी रुपये मिळाले आहेत. आशुतोष राणाने ८० लाख रुपये तर दिव्या दत्ताने ४५ लाख रुपये फी घेतलीय.
विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराज तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्ना औरंगजेब तर आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आहेत.