भरजरी वस्त्र, दागिन्यांचा साज अन् डोळ्यात करारी बाणा..रश्मिकाचा 'छावा' लूक पाहाच

Chhaava Rashmika New Look | रश्मिकाचा 'छावा'मधील महाराणी येसूबाई लूक, तुम्हाला कसा वाटला?
Chhaava Rashmika New Look |
रश्मिकाचा 'छावा'मधील महाराणी येसूबाई लूक, तुम्हाला कसा वाटला? Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - पुष्पाची श्रीवल्ली आता महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सने चित्रपट 'छावा'मधून रश्मिका मंदानाचा लूक जारी केला आहे. याआधी चित्रपटाचा टिझर आणि नवे पोस्टर सिनेरसिकांच्या पसंतीस उतरले होते. तर अभिनेता विक्की कौशल मुख्य भूमिकेत असून तो छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

छावा चित्रपटाचा ट्रेलर यादिवशी होणार रिलीज

छावा चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारीला रिलीज होणार आहे. तर चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो सिनेमागृहात रिलीज होणार आहे. maddockfilms ने इन्स्टाग्रामवर रश्मिकाचे दोन नवे लूक शेअर केले आहेत. त्यामध्ये कॅप्शन लिहिलीय- Behind every great king, there stands a queen of unmatched strength. Introducing @rashmika_mandanna as Maharani Yesubai - the pride of Swarajya. #ChhaavaTrailer Out Tomorrow!

चित्रपटात रश्मिका मंदाना छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कलाकारांमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांसारखे दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उटेकर यांनी केलं आहे. ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमान यांनी संगीत दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news