

पुढारी ऑनलाईन डेस्क - थरार पुन्हा आला आहे, स्तर उंचावला आहे आणि रोमांच अधिक वाढला आहे. सोनी लिव्हवरील सिरीज ‘चमक: द कन्क्लुजन' ४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सीरीज संगीत, रहस्य व सूडाच्या रोमांचक मनोरंजनाची खात्री देते. रोहित जुगराज यांच्याद्वारे निर्मित व दिग्दर्शित या सीरीजने वेब स्पेसला नव्या उंचीवर नेले आहे, जेथे प्रेक्षकांमध्ये लक्षवेधक कथानक आणि उच्चस्तरीय परफॉर्मन्ससह उत्सुकता निर्माण केली आहे.
निर्माता व दिग्दर्शक रोहित जुगराज म्हणाले, “संगीत हा सीरीज ‘चमक'चा महत्त्वपूर्ण पैलू राहिला आहे आणि सीझन २ मध्ये ही सीरीज कालाच्या सूडाच्या प्रवासाची महत्त्वपूर्ण भाग बनली आहे. प्रत्येक बीट, गीत व ताल त्याची वेदना, सूड आणि निर्धारामध्ये अधिक वाढ करतात. हा सीझन फक्त समाधानापुरता मर्यादित नसून संगीत व शक्तीच्या माध्यमातून न्यायाचा शोध घेतो.''
रोहित जुगराजद्वारे निर्मित व दिग्दर्शित या सीरीजचे निर्माते गीतांजली मेहेल्वा चौहान, रोहित जुगराज व सुमीत दुबे आहेत. परमवीर सिंग चीमा, मनोज पाहवा, गिप्पी गरेवाल यांची खास उपस्थिती, मोहित मलिक, ईशा तलवार, मुकेश छाब्रा, प्रिन्स कंवलजीत सिंग, सुविंदर (विकी) पाल आणि आकासा सिंग हे कलाकार आहेत.