

Sunny Deol Border movie
मुंबई : ‘बॉर्डर २’ हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘बॉर्डर’ या वॉर ड्रामा चित्रपटाचा पुढचा भाग आहे. चित्रपटगृहात ‘बॉर्डर २’ पाहण्यापूर्वी तुम्हाला ‘बॉर्डर १’ पाहावा लागेल. तुम्ही ‘बॉर्डर १’ जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. जर तुमच्याकडे पूर्ण चित्रपट पाहण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही ‘बॉर्डर १’ ची कथा थोडक्यात येथे वाचू शकता.
‘बॉर्डर १’ (१९९७) ची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान झालेल्या 'लोंगेवालाच्या लढाईवर' आधारित आहे. जेव्हा युद्धाची चिन्हे दिसू लागली, तेव्हा लोंगेवाला येथे मेजर कुलदीप सिंह चांदपुरी (सनी देओल) यांच्या नेतृत्वाखाली १२० भारतीय जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, पाकिस्तानची एक संपूर्ण टँक रेजिमेंट (सुमारे २०००-३००० सैनिक) त्याच रात्री त्यांच्यावर हल्ला करणार आहे.
अशा परिस्थितीत त्यांनी हवाई दलाकडे मदत मागितली, परंतु त्याकाळी 'हंटर' विमाने रात्री उड्डाण करू शकत नव्हती. त्यामुळे जवानांना दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पोस्टचे रक्षण करण्याचा आदेश देण्यात आला होता. रात्रभर भारतीय जवानांनी आपल्या शौर्याने आणि चपळाईने पाकिस्तानी सैन्याला रोखून धरले आणि सकाळ होताच विंग कमांडर एम.के. बाजवा (जॅकी श्रॉफ) यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाने शत्रूचे टँक उद्ध्वस्त केले. भारताने हे युद्ध जिंकले, पण अनेक शूर शिपायांना वीरमरण आले.
मेजर कुलदीप सिंह चांदपुरी (सनी देओल) चित्रपटाच्या शेवटपर्यंत जिवंत राहतात आणि आता ‘बॉर्डर २’ मध्ये दाखवल्या जाणाऱ्या युद्धात ते मुख्य भूमिकेत दिसतील. कॅप्टन भैरों सिंह (सुनील शेट्टी) आणि लेफ्टनंट धर्मवीर भान (अक्षय खन्ना) शहीद होतात. विंग कमांडर आनंद (जॅकी श्रॉफ) जिवंत राहतात. तर तब्बू, पूजा भट्ट आणि इतर सैनिकांचे कुटुंबीय ज्यांनी सामान्य नागरिकांची भूमिका साकारली होती, ते शेवटपर्यंत सुरक्षित राहतात.
‘बॉर्डर १’ हा चित्रपट १० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'सॅकनिल्क'च्या अहवालानुसार, या चित्रपटाने १९९७ मध्ये भारतीय बॉक्स ऑफिसवर ३९.३० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरातून एकूण ६४.९८ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.