bollywood remake : दाक्षिणात्य सिनेमानेही केली बॉलीवूडची कॉपी

bollywood remake : दाक्षिणात्य सिनेमानेही केली बॉलीवूडची कॉपी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या देशात दाक्षिणात्य चित्रपटांची चलती आहे. तथापि, प्रेक्षकांसाठी चित्रपट दाक्षिणात्य असो की (bollywood remake) बॉलीवूडचा काही फरक पडत नाही. त्यांना मनोरंजनाशी मतलब असतो आणि मुद्दा फ—ेश कथानक, मांडणीचा असतो. अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांची छाप पाहता अनेकजण बॉलीवूडला नावे ठेवत असतात. पण बॉलीवूडमधीलही अनेक चांगल्या चित्रपटांचे रीमेक दक्षिण भारतातील विविध भाषांमध्ये झालेले आहेत. ही परंपरा अगदी 60 च्या दशकापासून आहे. अलीकडच्या काळात दक्षिणेत झालेल्या बॉलीवूड चित्रपटांच्या रीमेकवर एक नजर… (bollywood remake)

अंधाधुन

श्रीराम राघवन दिग्दर्शित हा चित्रपट मूळ 'द पियानो ट्युनर'या शॉर्ट फिल्मवर आधारित होता. आयुष्मान खुराणा, तब्बू, राधिका आपटे दिग्दर्शित हा चित्रपट यशस्वी ठरला. या चित्रपटाचे माएस्ट्रो (तेलगू), भ—मम (मल्याळम) आणि अंधागन (तमिळ) असे रिमेक झाले आहेत.

अ वेन्सडे

नीरज पांडे दिग्दर्शित आणि नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांच्या भूमिकांनी नटलेला हा एक उत्तम चित्रपट आहे. या चित्रपटाचा तमिळमध्ये उन्नाईपोल ओरुवन, तेलगूमध्ये ईनाडू असे रिमेक झाले. यात तमिळमध्ये कमल हासन आणि मोहनलाल यांच्या भूमिका होत्या, तर तेलगूमध्ये कमल हासन आणि व्यंकटेश यांच्या भूमिका होत्या.

मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाच्या या सीक्वेलचा चिरंजीवीने तेलगूमध्ये 'शंकरदादा झिंदाबाद'या नावाने रीमेक केला. राजकुमार हिराणी दिग्दर्शित संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आजही अनेकांचा फेव्हरेट आहे. याचे वसूल राजा एमबीबीएस (तमिळ), शंकरदादा एमबीबीएस (तेलगू), उप्पी दादा एमबीबीएस (कन्नड) असे रिमेक झाले आहेत. यात तमिळ व्हर्जनमध्ये कमल हासनने तर तेलगूमध्ये चिरंजीवीने संजय दत्तने साकारलेली भूमिका केली होती.

बँड बाजा बारात

अनुष्का शर्मा, रणवीर सिंग यांच्या या चित्रपटाचे अहा कल्याणम (तमिळ), जबरदस्त (तेलगू) असे रिमेक झाले आहेत. पैकी तेलगू रिमेकमध्ये समंथा आणि सिद्धार्थ यांच्या भूमिका होत्या.

जब वुई मेट

करिना कपूरच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट तमिळमध्ये 'कंदेन कधालाई' या नावाने बनवला गेला. त्यात तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत होती.

ओह माय गॉड

अक्षयकुमार, परेश रावल यांच्या या चित्रपटाचे गोपाला गोपाला (तेलगू), मुकुंदा मुरारी (कन्नड) असे रिमेक झाले आहेत.

दिल्ली बेल्ली

अभिनय देव दिग्दर्शित या चित्रपटाचा तमिळमध्ये 'सेत्ताई' या नावाने रिमेक झाला होता. ही यादी बरीच मोठी आहे. अगदी 60 च्या दशकापासून बॉलीवूडचे चित्रपट दक्षिणेत रिमेक होत आहेत. अलीकडच्या काळातील आणखी काही नावे सांगायची तर मिस्टर इंडिया, आँखे, क्रांतिवीर, घायल, घातक, बाजीगर, परदेस, इश्क, सरफरोश, खाकी, बंटी और बबली, खोसला का घोसला, लव्ह आज कल, कहानी, पिंक या चित्रपटांचे दाक्षिणात्य भाषेत रिमेक झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news