Top 10 Indian Actress : दक्षिणेतील या अभिनेत्रीचा पहिला क्रमांकावर कब्जा; दीपिका-आलियाही मागे, जाणून घ्या कोण आहे ती सुंदरी?

पहिल्या क्रमांकावर कोणत्या अभिनेत्रीने स्थान मिळवले आणि कोणत्या अभिनेत्रीचा क्रमांक सर्वात शेवटी आहे, जाणून घेऊया.
Top 10 Indian Actress
Top 10 Indian Actress : दक्षिणेतील या अभिनेत्रीचा पहिला क्रमांकावर कब्जा; दीपिका-आलियाही मागे, जाणून घ्या कोण आहे ती सुंदरी?file photo
Published on: 
Updated on: 

bollywood ormax top 10 indian actress october 2026 list samantha ruth prabhu on top alia bhat sai-pallavi deepika padukone in list

पुढारी ऑनलाईन : यावेळीही टॉप १० च्या यादीत दक्षिण भारतीय अभिनेत्रींचे वर्चस्व पाहायला मिळाले. ऑक्टोबर २०२६ मधील ही यादी जाहीर झाली असून, पहिल्या क्रमांकावर कोणत्या अभिनेत्रीने स्थान मिळवले आणि कोणत्या अभिनेत्रीचा क्रमांक सर्वात शेवटी आहे, जाणून घेऊया.

Top 10 Indian Actress
Box Office Day 17 : ‘रामायण’ची कमाई ९०० कोटींच्या पार; आणखी एक मोठा विक्रम नावावर!

ऑरमॅक्स मीडियाच्या टॉप १० यादीची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. मग ती यादी अभिनेत्यांची असो किंवा अभिनेत्रींची. आता अभिनेत्रींची टॉप १० यादी समोर आली आहे. यावेळी या यादीत बरेच बदल पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, यावेळीही दक्षिण भारतीय अभिनेत्रींचे वर्चस्व कायम आहे. ऑक्टोबर २०२६ मधील या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणत्या अभिनेत्रीने स्थान मिळवले आणि कोणत्या अभिनेत्रीचा क्रमांक सर्वात शेवटी आहे, ते पाहूया...

सामंथा रुथ प्रभू

ऑरमॅक्सच्या यादीत दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. या महिन्यातही ती पहिल्या स्थानावर कायम आहे. सध्या सामंथासाठी हा काळ विशेष ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच सामंथा एका गोंडस बाळाची आई झाली आहे.

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ऑरमॅक्स मीडियाच्या टॉप १० यादीत यावेळी आलिया भट्टने दुसरे स्थान मिळवले आहे.

Top 10 Indian Actress
भारत-पाक सीमेवर ड्रोनमधून टाकले शस्त्रांचे पॅकेट; ४ पिस्तुले अन् हेरॉईन जप्त

दीपिका पदुकोण

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच शाहरुख खानसोबत 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. या यादीत दीपिका तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना अलीकडेच 'रणबाली' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती तिचा पती विजय देवरकोंडासोबत झळकली होती. ऑरमॅक्सच्या यादीत रश्मिकाने चौथे स्थान मिळवले आहे.

साई पल्लवी

साई पल्लवी सध्या तिच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. या चित्रपटात साई पल्लवीने माता सीतेची भूमिका साकारली आहे. ऑरमॅक्सच्या यादीत ती पाचव्या क्रमांकावर आहे.

काजल अग्रवाल

दक्षिण भारतीय अभिनेत्री काजल अग्रवालने यावेळी सहावे स्थान मिळवले आहे. काजल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

नयनतारा

दक्षिण भारतीय अभिनेत्री नयनतारा आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ऑरमॅक्सच्या या यादीत नयनताराने सातवे स्थान मिळवले आहे.

ममिता बैजू

ममिता बैजू अलीकडेच 'विश्वनाथ अँड सन्स' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या चित्रपटात ममितासोबत सूर्या झळकला होता. विशेष म्हणजे, ऑरमॅक्सच्या या यादीत ममिता बैजूने पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. ती आठव्या क्रमांकावर आहे.

कृती सेनॉन

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉनचाही या यादीत समावेश झाला आहे. तिने नववे स्थान पटकावले आहे.

तृषा कृष्णन

दक्षिण भारतीय अभिनेत्री तृषा कृष्णननेही ऑरमॅक्सच्या टॉप १० यादीत स्थान मिळवले आहे. ती या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.