Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’च्या गायकासाठी CM मोहन यादवांची मोठी घोषणा; सुनील लोधींच्या डोळ्यांवर होणार उपचार

‘मैंने तेरे ही भरोसे’ भजनाने गाजला आवाज; सुनील लोधींच्या डोळ्यांच्या उपचारासाठी CM मोहन यादव सरसावले
Hanuman Ansh
Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’च्या गायकासाठी CM मोहन यादवांची मोठी घोषणा; सुनील लोधींच्या डोळ्यांवर होणार उपचारfile photo
Published on
Updated on

bollywood news neem karoli baba hanuman ansh singer sunil lodhi cm mohan yadav eye treatment 111 crore box office magic

पुढारी ऑनलाईन नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. अवघ्या २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत तब्बल १११ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटासोबतच त्यातील कलाकार आणि गायकही चर्चेत आले आहेत. चित्रपटातील ‘मैंने तेरे ही भरोसे’ हे भजन सध्या मोठ्या प्रमाणात ऐकले जात आहे. हे भजन बुंदेलखंडातील नेत्रहीन गायक सुनील लोधी यांनी गायले आहे.

Hanuman Ansh
Bollywood News : ‘वरच्याने ठरवल्या आहेत...’ सुनीताच्या धोका दिल्याच्या आरोपांवर गोविंदाने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला..

सुनील लोधी यांच्या आवाजाने हनुमान भक्तांची मने जिंकली आहेत. त्यांच्या प्रतिभेची दखल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनीही घेतली. मुख्यमंत्र्यांनी सुनील लोधी यांची भेट घेत त्यांच्या डोळ्यांवर सरकारच्या माध्यमातून उपचार करण्याची घोषणा केली. तसेच त्यांना १ लाख रुपयांची सन्मान निधी देण्याचेही जाहीर केले.

मुख्यमंत्री निवासस्थानी झाली भेट

४ सप्टेंबर २०२६ रोजी सुनील लोधी आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथील मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी त्यांचे स्वागत केले. सुनील यांनी तंबुरा वाजवत मुख्यमंत्र्यांसमोर त्यांचे प्रसिद्ध भजन सादर केले. त्यांच्या आवाजाचे आणि संगीत प्रतिभेचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सुनील यांच्या डोळ्यांवर सरकारच्या माध्यमातून उपचार करण्याचे आश्वासन दिले. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. उपचारानंतर त्यांची दृष्टी परत येण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज घेतला जाईल.

याशिवाय सुनील यांचे संगीत शिक्षण पूर्ण करण्यासाठीही सरकार मदत करेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच त्यांना राज्याच्या सांस्कृतिक विभागाशी जोडण्याचीही तयारी दर्शवली.

सुनील यांना १ लाख रुपयांचा सन्मान निधी

सुनील लोधी यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्यांना १ लाख रुपयांचा सन्मान निधी देण्याची घोषणा केली. त्यांच्या मेहनतीचा आणि यशाचा सन्मान म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे.

Hanuman Ansh
Disco Dancer : 180 फ्लॉप चित्रपट, तरीही बुडाले नाही करिअर; वयाच्या 72व्या वर्षी दिली सर्वात मोठी हिट... कोण आहे हा अभिनेता?

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुनील यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांना पुढे जाण्यासाठी सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल.

भेटीनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सुनील यांचा भजन गातानाचा व्हिडीओही शेअर केला. त्यांनी लिहिले की, सागर जिल्ह्यातील प्रतिभावान युवा बुंदेली गायक सुनील लोधी आणि त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करण्यात आला.

‘आता माझी दृष्टी परत येईल’, सुनील यांना आशा

मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि सन्मानामुळे सुनील लोधी यांनी आनंद व्यक्त केला. एवढे प्रेम मिळाल्याने आपल्याला खूप आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हनुमानजींच्या कृपेमुळेच हा चित्रपट इतका चांगला बनला,’ असेही सुनील यांनी म्हटले. मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेतल्याने आपल्याला खूप आनंद झाला असून, आता आपल्या डोळ्यांची दृष्टी पुन्हा परत येण्याची आशा निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news