Bollywood : ‘आदिपुरुष माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक’, मनोज मुंतशीर म्हणाले- ‘मला लाज वाटते की मी असे कसे...’

‘आदिपुरुष’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मोठ्या बजेटचा होता.
Bollywood News
‘आदिपुरुष माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक’, मनोज मुंतशीर म्हणाले- ‘मला लाज वाटते की मी असे कसे...’file photo
Published on
Updated on

bollywood manoj muntashir calls adipurush biggest mistake of my life ask for forgiveness

पुढारी ऑनलाईन : मनोज मुंतशीर हे लोकप्रिय लेखक आहेत. ते ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे लेखक होते. आता अनेक वर्षांनंतर त्यांनी या चित्रपटाबाबत वक्तव्य केले असून, हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मोठ्या बजेटचा होता. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र रिलीज झाल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्स आणि संवादांमुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यावेळी चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी चित्रपटाचा बचाव केला होता. मात्र, आता तेच त्यांची मोठी चूक असल्याचे मान्य करत आहेत.

Bollywood News
FRS : जंतर-मंतरवर आले 2,000 गुन्हेगार? पोलिसांच्या दाव्यावर CJPचा पलटवार – “आम्हीही तुमची यादी देऊ”

पत्नीचे म्हणणे न ऐकल्याचा मनोज मुंतशीर यांना पश्चात्ताप

मुलाखतीत मनोज मुंतशीर यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने त्यांना सार्वजनिकपणे चित्रपटाचा बचाव करू नका, असा सल्ला दिला होता. त्यांनी सांगितले की, ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होण्याच्या जवळपास सहा महिने आधीच लोकांनी निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती आणि या प्रोजेक्टला ट्रोल केले जात होते.

त्यांच्या पत्नीला भीती होती की, या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या संतापाचा फटका मनोज यांना बसू शकतो. मात्र, त्यांनी पत्नीचा सल्ला ऐकला नाही. आता मागे वळून पाहताना पत्नीचे म्हणणे न ऐकल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आदिपुरुष माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक’

चित्रपटाला झालेल्या विरोधाबाबत मनोज मुंतशीर म्हणाले, “सुरुवातीला मी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतले नाही. मला परिस्थिती समजून घेण्यासाठी दोन दिवस लागले. ‘आदिपुरुष’ ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे आणि या चित्रपटाचा बचाव करणे ही त्याहूनही मोठी चूक होती. चित्रपटाभोवती जे काही घडले, त्याची मला लाज वाटते आणि त्याबद्दल मी देशाची माफी मागतो.”

Bollywood News
CJP Jantar Mantar Protest : आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांची अभेद्य तटबंदी, रस्त्यावर ठोकले मोठे खिळे

‘मला लाज वाटते की मी ते सर्व लिहिले’

मनोज मुंतशीर यांनी असेही म्हटले की, भगवान राम आणि भगवान हनुमान यांच्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय देऊ न शकल्याची त्यांना खंत आहे. भगवान हनुमान यांच्याबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्याचाही चुकीचा अर्थ घेतला गेला, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “आता जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला लाज वाटते की मी ते सर्व कसे लिहिले. त्या वेळी मी नेमका काय विचार करत होतो, हेच मला कळत नाही.”

‘आदिपुरुष’ची स्टारकास्ट

‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास यांनी भगवान राम, क्रिती सेनन यांनी सीता, सैफ अली खान यांनी रावण, सनी सिंह यांनी लक्ष्मण आणि देवदत्त नागे यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती.

चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे बजेट सुमारे ६०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. त्या काळातील हा सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. रिपोर्ट्सनुसार, ‘आदिपुरुष’ने जगभरात सुमारे ३९० कोटी रुपयांची कमाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news