Bollywood News : बॉलिवूडची पहिली 'कोट्याधीश' अभिनेत्री; प्रत्येक निर्माता तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी असायचा उत्सुक..

बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार! कानन देवींच्या यशाची आजही होते चर्चा
Bollywood News
Bollywood News : बॉलिवूडची पहिली 'कोट्याधीश' अभिनेत्री; प्रत्येक निर्माता तिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी असायचा उत्सुक..file photo
Published on
Updated on

bollywood first crorepati actress all producer want to take her in their movies

पुढारी ऑनलाईन : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठे यश मिळवले. मात्र आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. इतकेच नव्हे तर त्या बॉलिवूडमधील पहिल्या कोट्याधीश अभिनेत्री असल्याचेही म्हटले जाते.

Bollywood News
Bollywood News : 'मन्नत'नंतर आता दिल्लीतील घराची चर्चा; शाहरुखने ३७ कोटींना केली मोठी खरेदी

कोण होत्या कानन देवी?

आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत त्या म्हणजे कानन देवी. कानन देवी या केवळ उत्कृष्ट अभिनेत्रीच नव्हत्या, तर त्या एक प्रतिभावान गायिकाही होत्या. आपल्या मधुर आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली. १९३० आणि १९४० च्या दशकात त्या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या.

किती मानधन घेत होत्या?

माध्यमांतील वृत्तांनुसार, कानन देवी एका चित्रपटासाठी तब्बल ५ लाख रुपये, तर एका गाण्यासाठी १ लाख रुपये मानधन घेत असत. त्या काळात अनेक चित्रपटांचे एकूण बजेटच अवघे १५ ते २० हजार रुपये असायचे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे त्यांना त्या काळातील पहिली कोट्याधीश अभिनेत्री मानले जाते.

Bollywood News
Bollywood News : आलियाच्या यशामागचं रहस्य उघड; पूजा भट्ट म्हणते बॉलिवूडमधले खेळ तिला उत्तम कळतात

कानन देवींबद्दल खास माहिती

कानन देवी यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी झाला. त्यांचा गोड आणि सुरेल आवाज लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकायचा. अभिनयातही त्यांनी आपल्या प्रतिभेची छाप पाडली. 'मुक्ती', 'विद्यापती', 'स्ट्रीट सिंगर' आणि 'जवाब' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

कानन देवी इतक्या यशस्वी झाल्या होत्या की प्रत्येक निर्माता त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सुक असायचा. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले.

५७ चित्रपट आणि ४० गाणी

वृत्तांनुसार, कानन देवी यांनी एकूण ५७ चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि सुमारे ४० गाणी गायली. पुरुषप्रधान चित्रपटसृष्टीत 'मॅडम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी के. एल. सैगल, पंकज मलिक, प्रमथेश बरुआ, पहाडी सान्याल आणि अशोक कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

वैयक्तिक आयुष्य

कानन देवी यांनी डिसेंबर १९४० मध्ये अशोक मैत्र यांच्याशी विवाह केला होता. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही आणि १९४५ मध्ये दोघे विभक्त झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news