रकुल प्रीत सिंहला गंभीर दुखापत! जिममध्ये बेल्ट न वापरता 80 किलो वजन उचलणे पडले महागात

Rakul Preet Singh Injury : दुखापतीतही 'दे दे प्यार दे-2' चित्रपटाचे शूटिंग
rakul preet singh suffers injury
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला जिममध्ये बेल्ट न वापरता 80 किलो वजन उचलणे महागात पडले आहे.Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडपासून साऊथपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती अनेकदा तिच्या वर्कआउटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सिनेसृष्टीतील फिट अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. मात्र, नुकतीच ती गंभीर दुखापतीची शिकार झाली आहे. खरं तर, जिममध्ये वर्कआउट सत्रादरम्यान 80 किलो डेडलिफ्टिंगमुळे तिच्या पाठीला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर असल्याने रकुलला अनिश्चित काळासाठी बेड रेस्टवर जावे लागले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रकुल प्रीत सिंह 5 ऑक्टोबर रोजी वर्कआउट करत होती. तिने बेल्ट न लावता 80 किलो वजनाची डेडलिफ्ट केली आणि यादरम्यान तिच्या पाठीतील नस ताणली गेली. यानंतर रकुल प्रीत सिंहला वेदना होऊ लागल्या. तिची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी अभिनेत्रीला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. पण तिने रेस्ट न घेतातच पेनकिलर गोळ्या घेऊन 'दे दे प्यार दे-2' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.

दरम्यान, सततच्या शूटिंग वेळपत्रकामुळे तिला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. तिने या दुखण्याकडे दुर्लक्ष केले. असे केल्याने रकुल प्रीत सिंहची प्रकृती तिच्या बर्थडे पार्टीच्या तासाभरापूर्वीच बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की, दुखापतीमुळे रकुल प्रीत सिंहच्या L4, L5 आणि S1 नसा ब्लॉक झाल्या आहेत. यानंतर डॉक्टरांनी तिला औषधे आणि इंजेक्शनही दिले. अभिनेत्रीची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

'दे दे प्यार दे 2' हा 2019 मध्ये आलेल्या 'दे दे प्यार दे' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 1 मे 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रकुल प्रीत सिंहने 2009 मध्ये कन्नड चित्रपट गिलीद्वारे अभिनयाच्या जगात प्रवेश केला. यानंतर तिने हिमांश खुरानासोबत 'यारियां'मधून हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. अलीकडेच ती कमल हासनसोबत 'इंडियन 2' या तमिळ चित्रपटात दिसली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news