Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर 'चलो काश्मिर'चा नारा देत हा अभिनेता पहलगाममध्ये दाखल
Actor Atul Kulkarni At Pahalgam
जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णीने रविवारी थेट पहलगाम हे ठिकाण गाठले. तेथील परिस्थितीचे फोटो शेअर करत अतुलने पर्यटकांनी परत यावं, असं आवाहन केलं आहे.
अतुलने शेअर केलेल्या फोटोमध्ये विमानात केवल दोन ते तीन प्रवासी दिसून असून बाकी संपूर्ण विमान रिकामे दिसून येत आहे. दरम्यान, काश्मिरच्या निसर्ग सौंदर्याचे फोटोदेखील अतुल यांनी सोशल मीडियातून शेअर केले आहेत.
हल्ल्यानंतर एकीकडे पाकिस्तानविरोधी संतापाची लाट देशात दिसत असून दुसरीकडे काश्मिरमधील पर्यटन व्यवसाय टिकला पाहिजे, यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत.
अतुल कुलकर्णी सध्या काश्मीरमध्ये असून, पहलगाम आणि इतर पर्यटनस्थळांचे फोटो शेअर करत त्यांनी सांगितलं की, अलीकडेपर्यंत पूर्ण भरलेली असलेली विमानं दिसून येत होती आणि आता विमाने जवळपास रिकामी आहेत.
या पोस्टसोबत कााश्मिरियत, लव्ह कम्पॅशन, डिफिट टेरर असे विविध हॅशटॅग देखील वापरले आहेत. तसेच काश्मिरमला पुन्हा पर्यटकांची गरज आहे... असे आवाहनही अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
हिंदोस्तां की ये जागीर है
के डर से हिम्मत भारी है
हिंदोस्तां की ये जागीर है
के नफ़रत प्यार से हारी है
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
मैं आया हूँ , आप भी आएँ
अशी कविता अतुलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
अतुलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येदेखील काश्मिर ट्रिपचे अनेक क्षण शेअर केले आहेत. बोर्डिंग पासपासून विमान कर्मचाऱ्यांनी सोडलेली हाताने लिहिलेली चिठ्ठी, आणि विमानातील रिकाम्या जागांचे फोटोंचा समावेश आहे.
एका फोटोखाली त्यांनी लिहिलं आहे की, "मुंबई ते श्रीनगर. क्रू म्हणतं की विमान पूर्ण भरलेलं असायचं. आता पुन्हा भरायला हवं. चला ना, काश्मीरला जाऊया," असे अतुल यांनी म्हटले आहे.
काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याची झलक दाखविणारे फोटोही त्यांनी क्लिक केले आहेत. त्यात स्वच्छ आकाश, निसर्गाच्या कुशीत वाहणाऱ्या नद्या आणि हिरवाईचे फोटो आहेत.
काश्मीरमधील पर्यटन स्थळं जिथे पूर्वी गर्दी असायची, ती आता ओस पडली आहेत, हे त्यांच्या पोस्टमधील फोटोंवरून दिसत आहे.
त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये स्थानिक काश्मिरी नागरिक “आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो” असा फलक धरून उभा राहिलेला दिसत आहेत. दुसऱ्या एका फोटोमध्ये एक व्यक्ती तिरंगा ध्वज अभिमानाने फडकावताना दिसतो आहे.

