Bollywood : "पप्पा घरीच बसून असतात..." मुलांच्या या एका वाक्याने बॉबी देओल हादरला, दारू सोडली.. अन् केले दणक्यात कमबॅक

घरखर्च पत्नी चालवत होती, बॉबी देओल होता खचलेला; मुलांच्या एका प्रश्नाने घडवले कमबॅक
Bollywood News
Bollywood : "पप्पा घरीच बसून असतात..." मुलांच्या या एका वाक्याने बॉबी देओल हादरला, दारू सोडली.. अन् केले दणक्यात कमबॅकfile photo
Published on
Updated on

bobby deol talks about his bad phase of life says wife manages the finances children changed him

पुढारी ऑनलाईन : अभिनेता Bobby Deol ने अलीकडेच त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल खुलासा केला. काम मिळत नसल्याने तो निराश झाला होता आणि त्याला दारूचे व्यसन लागले होते. त्या काळात त्याची पत्नी Tanya Deol यांनी नोकरी करून घराचा आर्थिक भार उचलला. मात्र मुलांच्या एका प्रश्नाने त्याचे आयुष्यच बदलून गेले.

Bollywood News
Bollywood : बॉबी देओलने 'या' अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करण्यास दिला होता नकार

पत्नीने उचलला घराचा खर्च

टीव्ही कार्यक्रम Aap Ki Adalat मध्ये बोलताना बॉबी देओल म्हणाला, “जेव्हा तुम्ही हार मानता, तेव्हा स्वतःचीच कीव करू लागता. तुम्हाला वाटू लागते की तुमचं जग संपलं आहे, कुणालाच तुम्ही आवडत नाही. अशा वेळी काही वाईट सवयी लागतात. मला दारू पिण्याची सवय लागली. सुरुवातीला तुम्ही दारू पिता, पण नंतर दारूच तुम्हाला पिऊ लागते.”

ते पुढे म्हणाले, “माझी पत्नी तान्या ही माझी ताकद आहे, माझा आधारस्तंभ आहे. एक पत्नीच आपल्या नवऱ्याच्या कठीण काळातील बदल, राग आणि चिडचिड सहन करू शकते. तान्या नसती तर कदाचित आज मी इथे बसून बोलत नसतो.”

Bollywood News
Bollywood News : आलियाच्या यशामागचं रहस्य उघड; पूजा भट्ट म्हणते बॉलिवूडमधले खेळ तिला उत्तम कळतात

मुलांच्या या प्रश्नाने आयुष्य बदलले

बॉबी देओलने सांगितले, “तान्याने घर सांभाळले, घराचा खर्च उचलला आणि मला कधीही कमीपणाची भावना येऊ दिली नाही. ती नेहमी मला सकारात्मक विचार करायला सांगायची. पण खरा बदल तेव्हाच झाला, जेव्हा माझी मुलं त्यांच्या आईला विचारू लागली, ‘पप्पा नेहमी घरीच का असतात? तुम्हीच ऑफिसला का जाता?’”

“तो प्रश्न माझ्या मनाला खूप लागला. मुलांना आपल्या वडिलांकडून अपेक्षा असतात. त्यानंतर माझ्यात अचानक बदल झाला. मी पुन्हा व्यायाम सुरू केला आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली.”

सलमान खानने दिली संधी

यानंतर बॉबी देओलने आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली. त्‍याला Salman Khan ने Race 3 या चित्रपटात संधी दिली. त्यानंतर तो Aashram आणि Class of '83 यांसारख्या प्रकल्पांमध्ये झळकला आणि प्रेक्षकांची पसंती मिळवली.

गेल्या काही वर्षांत बॉबी देओलच्या कारकिर्दीला नवी उभारी मिळाली आहे. विशेषतः २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या Animal या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची जगभर चर्चा झाली. आता तो अनेक नव्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news