

Ajay Devgn BMC Action: प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांच्या मुबंईतील जुहू भागातील बंगल्यामधील अनधिकृत बांधकामावर बीएमसीचा हातोडा पडला आहे. ही कारवाई अजय देवगणला अनधिकृत बांधकाम थांबवण्याची नोटीस दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी करण्यात आली आहे.
जुहू मधील कपोले को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये अजय देवगणचा ७ हजार ८०२ स्क्वेअर फीटमध्ये बंगला आहे. महानगरपालिकेनुसार अजय देवगणच्या बंगल्यात अंतर्गत बदल, पार्टीशन वॉलची उंची वाढवणे, खिडक्यांचे मॉडिफिकेशन आणि इतर स्ट्रक्चरल वर्क सुरू आहे. मात्र यासाठी महानगरपालिकेची आवश्यक ती परवानगी घेण्यात आलेली नाही.
याबाबत बीएमसीने याबाबतची अधिकृत नोटीस १० सप्टेंबर रोजी दिली होती. ही नोटीस मुंबई महानगरपालिका कलम ३५४ अ अंतर्गत पाठवण्या तआली होती. हे अवैध बांधकाम त्वरित रोखण्याचे आदेश देखील दिले होते. तसेच याबाबत वैध कागदपत्रे देखील सादर करण्यास सांगितलं होतं.
मात्र, बांधकाम तसचं सुरू राहीलं अन् नोटिशीचा अवमान करण्यात आला. त्यानंतर आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम स्थळी जाऊन अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात केली. मिळालेल्या फोटोंमध्ये अधिकारी हातोड्याने हे बांधकाम पाडत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अजय देवगण हा अजून एका वादात अडकला आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीवरून हा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या फूड डेव्हलपमेंट अथोरिटीने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याच्या सोबत शाहरूख खान आणि टायगर श्रॉफ यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.
महाराष्ट्र एफडीए प्रमुख तुकाराम मुंढे हे देखील सिंघम स्टाईल कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ही जाहिरात बंदी असलेल्या उत्पादनाचा छुपा प्रचार करणारी जाहिरात आहे का याचा तपास करण्यात येत आहे असं सांगितलं.