Bigboss Marathi :'गुलीगत सुरज' झळकणार मोठ्या पडद्यावर, 'या' चित्रपटात दिसणार

केदार शिंदे यांनी दिली सुरजला चित्रपटाची ऑफर
Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
बिग-बॉस विजेता सुरज चव्हाण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग-बॉस मराठी' या रियारॅटी शोचे सुत्रसंचालन रितेश देशमुख यांनी अगदी दिमादार पद्धतीने केल्याने व जनमानसात आपला ठसा उमटवलेल्या सदस्यांना या 'रियारॅटी शो' मध्ये घेतल्याने 'बिग बॉस मराठी'ला लोकांनी चांगलेच उचलून धरले. 'बिग- बॉस'ची टॉफी कोण घेणार? यामध्ये चाहत्यांना धाकधूक लागली असतानाच 'गुलीगत पॅटन'ने सुरज चव्हाणने ७० दिवसाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर बिग-बॉसच्या टॉफीवर आपले नाव कोरले.

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Bigboss Marathi : पाचव्या पर्वाचा विजेता 'सुरज चव्हाण'वर बक्षिसांचा वर्षाव!

रिल्सच्या माध्यमातून चाहत्यामध्ये आपले वेगळे वलय निर्माण करणाऱ्या सुरजला 'बिग-बॉस मराठी'मध्ये संधी मिळाली. या संधीचे सोने करत तो 'बिग-बॉस'चा विजेता ठरला. बारामतीच्या एका छोट्याशा गावातील सुरजने सुरूवातीला बिग-बॉसमध्ये येण्यास नकार दिला. मात्र नंतर बिग-बॉसच्या टीमने त्याची समजूत काढल्यानंतर तो या शोमध्ये यायला तयार झाला. सीजन-५ मध्ये सुरज आणि अभिजीतमध्ये सामना रंगला असताना केदार शिंदे यांनी 'झापूक-झुपुक' हा चित्रपट आपण करणार असून यामध्ये 'सुरज चव्हाण' या चित्रपटाचा नायक असल्याचे सांगितल्याने आपला सर्वाचा लाडका सुरज आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan
Big Boss Marathi : 'गुलीगत पॅटर्न' ठरला बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news