.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क - लोकप्रिय, दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या मातृत्वावरून निक्की तंबोलीने केलेल्या वक्तव्यामुळे निक्कीला ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. आता अभिनेता अभिजीत केळकरने देखील संताप व्यक्त करत इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आणि बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली.
''...एखाद्या बाईच्या मातृत्वावर बोलताना ती कधी आई झाली आहे की नाही आणि ते आपल्याला माहीत आहे की नाही हे कसं मॅटर करतं? मुळात दुसऱ्याच्या इतक्या खाजगी आणि संवेदनशील विषयावर बोलणाऱ्या माणसांचं मानसिक आरोग्य पुन्हा एकदा तपासायला हवं... पण वर्षा ताई, तुमच्या संयमाला सलाम @varshausgaonker ताई, तुमच्या संयमाला सलाम🙏 ...शाब्बास @kokanheartedgirl अंकिता, तू करेक्ट स्टँड घेतलास 🤜🔥🤛''
बिग बॉसच्या घरात छोट्या पाहुण्यांना सांभाळण्याच्या टास्कमध्ये टीम ए जिंकली. पण निकी आणि वर्षा उसगावकर यांच्यात एक वाद झाला. निकीने वर्षा यांच्या मातृत्वाबद्दल भाष्य केलं, ज्यावरून प्रेक्षक नाराज झाले आणि निक्कीवर टीकाही झाली.
घरात टास्क सुरू होते. त्यावेळी निक्कीने B टीमच्या सदस्यांच्या बाहुलीचा एक पाय तोडला. बाहुलीची मुंडी, तंगडं तोडलं यावर उत्तर देताना निक्की म्हणाली, ''यांच्या भावना बघितल्या का? आईचं प्रेम कसं समजेल जाऊ देत. एका आईचं प्रेम काय असतं तुम्हाला काय माहिती?''
निक्कीच्या बोलण्याने वर्षा उसगावकरचे फॅन्स, प्रेक्षकच नव्हे तर बिग बॉसदेखील रागावले.
अंकिता हे वाक्य ऐकताच भावूक झाली. ती रागात निक्कीला म्हणाली, ए…तुझं हे बोलणं अतिशय चुकीचं आहे. निक्की म्हणाली, हे तू मला सांगू नकोस. या स्वत: तंगडं तोडलं म्हणाल्या आणि मला भावनांबद्दल सांगतात. निक्कीचा हा अरेरावीपणा पाहून वर्षा यांनी म्हटलं, “तू जे केलंय तेच मी सांगितलं… शब्द हे बाणासारखे असतात आणि ते परत घेता येत नाहीत एवढं लक्षात ठेव निक्की, एकदा बाण गेला की गेला.'