पुढारी ऑनलाईन डेस्क - जान्हवी-निक्की तंबोली यांच्यात भडका उडणार आहे. बिग बॉस मराठी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहायला मिळत आहे. यामध्ये जान्हवी म्हणते -दम असेल मला बाहेर काढून दाखव, चॅलेंज आहे. इथे कुणी ओळखत नव्हतं ना मराठी जनता...म्हणून आलीय मराठी झोनमध्ये. सगळ्यांना घाण झालीस तू या घरामध्ये. फडफड...चल...
निक्की म्हणते - काढलं ना म्हणून लई राग आलाय तिला.
दरम्यान, जान्हवी किल्लेकर अंकिता वालावलकर आणि फॅडीला सांगते की, मला ट्रॉफी मिळू दे अगर न मिळो मला निक्कीचा गर्व उतरवायचाय. पॅडी म्हणतो, उतरला गेलाय गं.
अंकिता म्हणते की, हतबल झालीय ती. आम्ही हसत होतो. फुटेज देऊ नकोस तू बाहेर जा, असे आम्ही तिला म्हणत होतो.
डीपी म्हणतो की, कॅप्टनसी हातातोंडाशी येत होतं, त्यात पण हे राडे.
दुसरीकडे आर्या आणि निक्की यांच्यात निंदनीय घटना घडलीय. आर्याच्या चुकाचा पंचनामा होणार आहे. आर्याला बिग बॉस मोठी शिक्षा देणार आहेत.
आज रात्री ९ वाजता निक्की आणि जान्हवीमध्ये भडका उडणार आहे.
एका युजरने म्हटलंय - जानव्हीने काय खेळ केलाय यार...एका बुक्कीत टेंगुळ, अरबाजचं तोंड बघण्यासारखं झालं होतं. दुसऱ्या युजरने म्हटलंय - आता कुठ खर खेळत्य जानवी अम्ही तुला ही सपोर्ट करू भिड तू. आणखी एकाने म्हटलंय-बाईई... हाच तो प्रकार ज्याची वाट पहात होता अख्खा महाराष्ट्र. तिसऱ्या युजरने लिहिलंय-आमचा फुल्ल सपोर्ट जान्हवी तुला असणार तू फक्त A टीम ला नड 😂. आणखी काही नेटकऱ्यांनी काय म्हटलंय पाहुया-Captaincy मधून काढलेल्याचा लयच राग आलेला दिसतोय जान्हवी ला 😮.