बिग बॉस 19च्या घरात रंग भरायला नव्याने सुरुवात झाली आहे. या घरात अनेक सदस्य त्यांच्या खऱ्या रूपात समोर आले आहेत तर काहीजण मात्र अजूनही स्वत:च्या कोशात आहेत. पण एकंदरीत हा शो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात काही अंशी का होईना यशस्वी झाला आहे.
या शोबाबतच्या अनेक चर्चांपैकी एक म्हणजे स्पर्धकांचे मानधन. या शोमध्ये कोणी किती मानधन हे आपण जाणून घेऊ.
बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त पैसे कुणाला मिळतात?
टेलिव्हिजन शो अनुपमामधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव खन्ना. एका रिपोर्टनुसार गौरव एका आठवड्यासाठी जवळपास 17.5 लाख इतके पैसे घेतो आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसासाठी तो 2.5 लाख चार्ज करतो आहे.
आतापर्यंतचा महागडा स्पर्धक कोण आहे ?
गौरव शोच्या इतिहासातील सगळ्यात महागडा स्पर्धक बनला आहे.
अमाल मलीकला किती पैसे मिळतात?
मानधनाबाबत क्रमांक दोन वर असलेला स्पर्धक म्हणजे अमाल मलीक. अमाल मलीक प्रत्येक आठवड्यासाठी 8.75 लाख रुपये घेतो आहे. त्याची रोजची कमाई 1.25 लाख आहे.
सगळ्यात कमी मानधन कोणाचे?
स्पर्धकांमध्ये सगळ्यात कमी मानधन घेणारे स्पर्धक आहेत मृदुल तिवारी आणि प्रणीत मोरे.
आणखी कोण किती मानधन घेते?
या घरात आवेज दरबार आणि अशनूर कौर हे एका आठवड्याला जवळपास 6 लाख रुपये घेतात.
मागील सीझनचा सर्वात महागडा स्पर्धक कोण?
मागच्या सर्व सीझनमध्ये निर्मात्यांनी करणवीर वोहराला सर्वात जास्त पैसे मोजले होते. त्याने बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये एका आठवड्यासाठी जवळपास 20 लाख रुपये चार्ज केले होते.