

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस 19 सध्या खुपच चर्चेत आहे. याचा 'वीकेंड का वार' हा एपिसोड खूपच भावनिक होता. यावेळी अभिनेत्री आणि वकील कुनिका सदानंदचा मुलगा अयान शोमध्ये आला. कुनिकाच्या मुलाने त्याच्या आईच्या संघर्षांबद्दल आणि बिग बॉसमधील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितले. खुद्द मुलाच्याच तोंडून आईने जीवनात केलेला संघर्ष ऐकून सलमान खानही यावेळी भावुक झाला.
आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे
अयान आईविषयी बोलताना भावनिक झाला होता. १२ वर्षांच्या नातवंडांपासून ते ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांपर्यंत, सर्वांना कुनिकाचा अभिमान वाटत असल्याचं अयानने यावेळी सांगताच सर्वजण भावनिक झाले. आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे, इतरांसाठी नाही, असं अयान आईला म्हणाला. हे शब्द ऐकून कुनिका भावनिक झाली आणि शोचा होस्ट असणाऱ्या सलमानला देखील अश्रू आवरता आले नाहीत.
मोठ्या भावाला शोधण्यासाठी वर्षानुवर्षे लढली कायदेशीर लढाई
या भागात सर्वात भावनिक क्षण आला जेव्हा अयानने त्याच्या आईच्या संघर्षांची कहाणी सांगितली. मोठ्या भावाला शोधण्यासाठी वर्षानुवर्षे आईने कायदेशीर लढाई कशी लढली याबाबतही अयानने सांगितले. आर्थिक अडचणी असूनही, कुनिकाने चित्रपट क्षेत्रात काम केले जेणेकरून ती कस्टडी केस लढू शकेल. मुंबई ते दिल्ली प्रवास करताना, तिने तिच्या कुटुंबासाठी सर्वस्व पणाला लावल्याचही अयानने यावेळी सांगितलं .
दोन्ही लग्ने ठरली अयशस्वी, तरीही...
अयानने यावेळी सांगितले कि त्याच्या आईची दोन लग्ने झाली पण दोन्ही लग्ने अयशस्वी ठरली. तिने पहिले लग्न फक्त 17 व्या वर्षी लग्न केले. पण लग्न यशस्वी झाले नाही आणि तिच्या मुलाचे अपहरण झाले. कस्टडी केस लढण्यासाठी तिने चित्रपटांचा मार्ग निवडला. नंतर दुसरे लग्न देखील अयशस्वी झाले, पण तिने कधीही हार मानली नाही. ती अमेरिकेत गेली आणि एक नवीन जीवन सुरू केले. अयानचा जन्म तिथेच झाला. वारंवार ब्रेकअप आणि आयुष्यातील अडचणी असूनही, तिच्यात आशा जिवंत राहिल्याचं अयान यावेळी म्हणाला.