Bigg Boss 19: बिग बॉस 19 चे घर कुठे आहे? घराचा एकूण खर्च किती? यावेळी कसे असणार घर? जाणून घ्या

मेकर्सनी बिग बॉस 19च्या घराची एक झलक शेयर केली आहे
Entertainement
Bigg Boss 19Pudhari
Published on
Updated on

बिग बॉसच्या 19 व्या सीझनची सुरुवात अगदी काही तासांवरच येऊन ठेपली आहे. अलीकडेच मेकर्सनी बिग बॉस 19च्या घराची एक झलक शेयर केली आहे. यावेळी घराचा अंदाज काहीसा हटके आहे. लोकशाही या थीमवर आधारलेल्या या घरची रचना ही तितकीच हटके आहे. (Latest Entertainment News)

नेहमीप्रमाणे काय आहे?

  • पूल एरिया

  • लॉन एरिया

  • जीम एरिया

  • घरात 100 कॅमेरे

कसा आहे हॉल?

या सीझनचा हॉल लाकडी डिझाईनवर बेस्ड दिसतो आहे. या शिवाय प्राण्यांचे विविध आकार लक्षवेधी आहेत. काही सीक्रेट खोल्या देखील आहेत. ज्या हळूहळू समोर येतील. जंगलात असलेल्या लॉग हाऊसप्रमाणे या घराची रचना केली आहे.

Pudhari

असेंबली रूम आहे मुख्य आकर्षण

हा सीझन लोकशाही थीमवर बेस असल्याने असेंबली रूम या सीझनचे मुख्य आकर्षण आहे. यामध्ये सदस्यांना चर्चा आणि वादविवाद करता येणार आहे. वी शेप असलेल्या या रूमच्या बाजूला टेबल आणि खुर्च्या आहेत. तर मध्ये माइक आहे.

कन्फेशन रूम अशी असणार?

यावेळी कन्फेशन रूमची डिझाईन आकर्षक रंगसंगतीने सजलेली आहे. त्यावर गरुडाची डिझाईन केली आहे

कुठे असणार जेल?

या सीझनचे वैशिष्ट म्हणजे बाकीच्या सीझनप्रमाणे यात जेल असणार नाही

बेडरूम एरिया कसा आहे?

या घरचा बेडरूम एरिया वूडन थीमवर आधारलेला आहे.

घरची किंमत किती?

बिग बॉसच्या प्रत्येक सीझनच्या थीमनुसार घरची बांधणी केली जाते. हे घर बनवायला आणि सीझन संपल्यानंतर तोडायला जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये खर्च येतो.

जीमचे साहित्य सलमानकडून

तुम्हाला माहिती आहे का या घरात असलेल्या जीमचे सगळे एक्विपमेंट्स सलमानकडून दिले जातात. ज्याचे सलमान कोणतेही पैसे घेत नाही.

रेंटने आणले जाते सामान

या घरात वापरले जाणारे सोफे, बेड, खुर्ची, एसी, टिव्ही हे सगळे सामान रेंटवरुन आणले जाते.

कुठे आहे बिग बॉसचे घर?

गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिगबॉसचे घर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news