AI Habubu: Bigg Boss 19 मध्ये येते आहे AI डॉल Habubu; असा असणार घरातील वावर

AI in Bigg Boss 19: आता रिअलिटी शोच्या क्षेत्रात AI ची अनुभूति घेता येणार आहे
Entertainement news
AI Doll HabubuPudhari
Published on
Updated on

AI ने जवळपास प्रत्येकक्षेत्र व्यापलेले आहे. आता रिअलिटी शोच्या क्षेत्रात AI ची अनुभूति घेता येणार आहे. बिग बॉस 19 चा यंदाचा सीझन AI मुळे अधिक खास ठरणार आहे. यावेळी स्पर्धकांमध्ये एक AI डॉलचाही समावेश असणार आहे.

बिग बॉस हा अत्यंत लोकप्रिय शो आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला या शोमध्ये विविध टास्क करताना पाहणे अनेकांना आवडते. आता हा गेम आणखी रंजक होईल. हबुबू असे या AI बाहुलीचे नाव आहे. हबुबूची निर्मिती युएईमध्ये झाली आहे.

बिग बॉसमध्ये हिचा रोबोटिक अवतार पाहायला मिळेल. बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच असा प्रकार घडतो आहे.

ही आहेत हबुबूची वैशिष्ट्ये :

  • बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नॉन ह्यूमन स्पर्धक घरचा भाग असणार आहे.

  • हबुबू एक संवाद साधू शकणारी AI आहे. ती भावना ओळखू शकते तसेच विविध विषयांवर सफाईने संवाद साधू शकते.

  • घरातील सदस्यांबाबत निष्पक्ष पद्धतीने मत मांडू शकेल अशी अपेक्षा हबुबूकडून व्यक्त केली जात आहे.

  • तिचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती संवाद साधताना कोणत्याही मशीनशी संवाद साधतो आहे असे अजिबात वाटत नाही.

  • विशेष म्हणजे ती एक नाही तर जवळपास सात भाषांमध्ये संवाद साधू शकते.

  • समोरच्या व्यक्तीच्या हावाभावावरून संवाद साधणे हे तिचे वैशिष्ट्य आहे.

  •  International Federation for Cultural Management (IFCM) ही हबुबूची मॅनेजिंग कंपनी आहे.

असा असणार लुक

  • यूएईमध्ये बनलेली असल्याने हिजाब हा हबुबूच्या पेहरावाचा प्रमुख पार्ट असणार आहे.

  • तरीही मेकर्स ती स्टाइलच्या बाबत आऊट डेटेड वाटणार नाही याची काळजी घेत आहेत.

  • अर्थात मेकर्सनी याबाबत जास्त खुलासा केला नाही. तरीही तिच्या येण्यापूर्वीच ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.  #HabubuBiggboss19 हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news