Gaurav Khanna BB-19 | गौरव खन्नाचा भावूक क्षण, पत्नी बिग बॉसच्या घरात येताच केलं Kiss; कंटेस्टेंटनी झाकले डोळे!

Gaurav Khanna BB-19 | गौरव खन्नाचा भावूक क्षण, पत्नीचा Kiss, बिग बॉसच्या घरात कंटेंस्टेंटनी झाकून घेतले डोळे
Gaurav Khanna with wife
Gaurav Khanna emotional in BB-19 houseInstagram
Published on
Updated on
Summary

बिग बॉस 19 मध्ये गौरव खन्नाची पत्नी घरात आली आणि भेटताच दोघांनी गोड Kiss शेअर केला. हा रोमँटिक आणि भावूक क्षण पाहून कंटेस्टेंटनी लाजून डोळे झाकले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल आहे.

मुंबई - फॅमिली वीकमध्ये सर्व कंटेस्टेंट्सचे घरवाले त्यांना सपोर्ट करायला येत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस 19’च्या एपिसोडमध्ये एक भावूक आणि रोमँटिक क्षण पाहायला मिळाला. लोकप्रिय टीव्ही अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा चमोला घरात खास सरप्राईज देण्यासाठी आली आणि तिची एन्ट्री पाहताच गौरवच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तो भावूक झालेला दिसला. त्याच्या पत्नीने जवळ येऊन आलिंगन दिले, यावेळी गौरवने तिचा किस घेतला, हे पाहून अमाल मलिक थोडा लाजला.

गौरवची पत्नी घरात येताच ‘बिग बॉस’च्या घरात एका क्षणातच वातावरण बदललं. नेहमी टास्क आणि ड्रामामुळे तंग वातावरणात असलेल्या घरात त्यावेळी प्रेमाचा क्षण पाहायला मिळाला. गौरवने पत्नीचा हात घट्ट धरत तिच्यासोबत काही खास वेळ घालवला.

बेस्ट परफॉर्मर गौरव खन्ना

गौरव खन्ना गेल्या काही आठवड्यांपासून घरात परफॉर्मन्स, स्ट्रॅटेजी आणि शांत स्वभावामुळे चर्चेत आहे.

Gaurav Khanna with wife
Tom Cruise |'ही मैत्री मी कायम जपून ठेवेन', 'मिशन इम्पॉसिबल'चा टॉम क्रूजला पहिला ऑस्कर, अनिल कपूरचे ट्विट चर्चेत

पहिल्या दिवशी कुनिका सदानंदचा मुलगा अयान आणि अशनूर कौरचे वडील बिग बॉगच्या घरात आले. आता गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाची देखील शोमध्ये एन्ट्री झाली. दुसरीकडे घरातील बेस्ट फ्रेंड्स फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल एकमेकांशी भिडलया.

फरहाना गार्डन एरियामध्ये थुकते. तान्या यावर फरहानाला महणते की, तिथे थुकू नकोस. यावर फरहाना भडकते. दोघांमध्ये भांडणे होतात. तान्या रागाच्या भरात फरहानाला म्हणते- तुला कुणीही घाबरत नाही. आणि कुणीही तुझा गुलाम नाही. फरहाना पलटवार करत उत्तर देते. फरहाना आणि तान्याचे भांडण पाहून अयान आश्चर्यचकित होतो.

Gaurav Khanna with wife
Dhurandhar Trailer : त्रिकुट खलनायकांचा ॲक्शन तडका, 'धुरंधर'चा ट्रेलर घेऊन जबरदस्त सुपरस्टार्स आमने-सामने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news