

‘भूत पुलिस २’ मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या भागातील सैफ अली खान आणि अर्जुन कपूरची जोडी या सिक्वेलमध्ये दिसणार नाही. दिग्दर्शकही बदलला असून कथेचा टोन, स्टारकास्ट आणि संपूर्ण टीम नव्याने तयार होत आहे.
arjun kapoor and saif ali khan is out Bhoot Police 2
मुंबई - बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'भूत पुलिस' २०२१ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांनी चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता निर्माते चित्रपटाचा दुसरा भाग आणण्याच्या तयारी करत आहेत. औत्सुक्याची गोष्ट म्हणजे, दुसऱ्या भागातून जुने चेहरे बाहेर करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
नव्या कलाकारांच्या सोबत 'भूत पुलिस' चा दुसरा भाग येणार?
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाईडच्या रिपोर्टनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार, निर्माते 'भूत पुलिस'च्या दुसऱ्या भागावर गपचुप काम करत आहेत. कथा लिहिली गेलीय, सोबतच नवी कास्टिंग प्रक्रिया सुरु आहे. निर्माते सीक्वल आणखी चांगले बनवण्यासाठी नव्या कलाकारांसोबत फ्रेंचायजी नव्या रुपात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आता निर्माते कोणत्या कलाकारांची निवड करतील, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
नवीन टीमनुसार, सिक्वेलमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारची कथा, नवीन पात्रे आणि तरुण कलाकार असणार आहेत. कास्टिंगबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र दोन तरुण कलाकारांची नावे चर्चेत आहेत. निर्मात्यांकडून याविषयीची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
'या' दिग्दर्शकांला मिळाली जबाबदारी
२०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'भूत पुलिस'ला पवन कृपलानीने दिग्दर्शित केलं होतं. आता दुसऱ्या भागाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रियदर्शनकडे सोपवण्यात आली आहे. रमेश तौरानी आणि अक्षय पुरी निर्मातीसाठी एकत्र येत आहेत. प्रियदर्शनने 'हेराफेरी', 'भूल भुलैया' सारख्या अनेक कॉमेडी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 'भूत पुलिस २' चे नवे कलाकार आणि रिलीज तारीख घोषित होणे अद्याप बाकी आहे.