नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (aai kuthe kay karte) या मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सणाचं पावित्र्य जपत संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंद लुटताना दिसतात. aai kuthe kay karte मालिकेत देशमुख कुटुंबात हा पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार आहे.
सध्या घरात तणावाचं वातावरण असलं तरी कांचन आजीने मात्र पुढाकार घेतला. तिने हा नवरात्रीचा सण साजरा करण्याचं ठरवलं आहे. कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते.
घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. महिलांच्या सुफलीकरणाचा सण म्हणून या सणाला विशेष महत्त्व आहे.
तेव्हा अरुंधती आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाचा हा भोंडला नक्की पहा. त्यासाठी पाहायला विसरु नका आई कुठे काय करते सोमवार ते सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.