५ वर्षानंतर 'तारक मेहता' फेम Bhavya Gandhi चे कमबॅक, 'या' शोमध्ये दिसणार

'तारक मेहता' फेम भव्य गांधीचे ५ वर्षानंतर टीव्हीवर कमबॅक
Bhavya Gandhi in Pushpa Impossible
तारक मेहता मालिकेतील टप्पू आता नव्या भूमिकेत दिसणार Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी पुन्हा टीव्हीवर येणार आहे. तब्बल ५ वर्षांनंतर त्याचे कमबॅक पाहायला मिळेल. तो टीव्ही मालिका 'पुष्पा इंपॉसिबल' मध्ये दिसेल. त्याची भूमिका अगदी वेगळी असेल. तारक मेहता मध्ये कॉमिक भूमिका होती. आता नव्या मालिकेत तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

'पुष्पा इंपॉसिबल'मध्ये सायको विलेन

भव्य गांधी 'पुष्पा इंपॉसिबल'मध्ये सायको विलेनच्या भूमिकेत असेल. त्याच्या भूमिकेचे नाव प्रभास असे आहे. एका मुलाखतीत त्याने आपल्या भूमिकेबद्दल सांगितले आहे.

'पुष्पा इम्पॉसिबल' सोनी सबवर प्रसारित झाला आहे. भव्य गांधीने खलनायकाच्या भूमिकेत ग्रँड एन्ट्री केली आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर एपिसोडची झलक पाहायला मिळते.

काय आहे खलनायकाची 'पुष्पा इम्पॉसिबल' मालिकेतील कहाणी?

भव्य गांधीची खतरनाक सायको खलनायक म्हणून एन्ट्री झाल्यानंतर पुष्पा आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात अराजकता येणार आहे. तो बदला घेण्यासाठी आला आहे. प्रभास नावाचा हा सायको विलेन आहे. तो म्हणाला-'प्रभास कधी काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही. तो खूप शांत दिसतो, पण तो खतरनाक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news