

पुढारी ऑनलाईन डेस्क : मातृदिनाचे औचित्य साधून 'जननी' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आणि आयेशा झुल्का यांच्या भावमुद्रा असलेले 'जननी'चे हृदयस्पर्शी पोस्टर सोशल मीडियावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. मातृत्व प्रेमाचे भावबंध अधोरेखित करणारी विलक्षण कथा घेऊन जननी लवकरच मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेते मोहनीश बहल, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे. तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या आईच्या मातृत्वाची कथा 'जननी' चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आलीय. मूळ हिंदी असलेला हा चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत खास मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे.