

पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो 'भाभी जी घर पर हैं'चे लेखक मनोज संतोषी यांचे निधन झाले. (Bhabiji Ghar Par Hain) तर याच मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारे अभिनेते आसिफ शेख यांची अचानक तब्येत बिघडली. आसिफ शेख यांनी विभूति नारायण ही भूमिका या मालिकेत साकारली आहे. शूटिंगवेळी आसिफ शेख यांना अचानक सेटर चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. ६० वर्षीय अभिनेते आसिफ शेख सध्या डेहरादूनमध्ये मालिकेचे शूटिंग करत होते. अद्याप त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट आलेली नाही.
आसिफ शेख यांनी २०१५ मध्ये ‘भाभी जी घर पर हैं’ शोमध्ये एन्ट्री घेतली. शोमध्ये ते विभूति नारायणच्या भूमिकेतून लोकप्रिय झाले. त्याशिवाय, ‘हम लोग’, ‘यस बॉस’, ‘गुल सनूबर’ आणि ‘डोंट वरी चाचू’ सारख्या मालिकेत ते दिसले. अनेक चित्रपटांमध्येही ते दिसले. करण-अर्जुन, एक फूल तीन कांटे, हसीना मान जाएगी यासारख्या चित्रपटात त्यांच्या भूमिका आहेत.
मनोज संतोषींना अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते दीर्घकाळापासून यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होते. मनोष संतोषी लिवर कॅन्सरने पीडित होते. २३ मार्च रोजी सिकंदराबादच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज संतोषी यांचे लिवर ट्रान्सप्लांट होणार होते. (Writer Manoj Santoshi Death)
हप्पू की उलटन पलटन, एफआयआर, भाभी जी घर पर हैं, जीजा जी छत पर हैं यासारख्या अनेक हिट मालिकांचे ते लेखक होते. भाभी जी घर पर हैं या मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने एका इंग्रजी वबसाईटशी बोलताना रुग्णालयावर बेजबाबदारीचा आरोप केला आहे.