BBM - 6 | हाय-व्होल्टेज ड्रामा! सोनाली विरुद्ध रोशन, बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क गाजला

BBM - 6 | बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्कवेळी हाय-व्होल्टेज ड्रामा; सोनालीने कापली रोशनची पतंग!
bigg oss marathi 6 contestant
bigg oss marathi 6 latest episode updates pudhari photo
Published on
Updated on
Summary

बिग बॉस मराठी 6 मधील नॉमिनेशन टास्कदरम्यान सोनालीने घेतलेल्या धक्कादायक निर्णयामुळे रोशन अडचणीत आला. या टास्कने घरातील समीकरणं बदलली आहेत.

bigg oss marathi 6 todays episode updates

बिग बॉस मराठी 6 च्या घरात दिवसेंदिवस खेळ अधिकच रंगतदार होत चालला आहे. नॉमिनेशन टास्कदरम्यान झालेल्या हाय-व्होल्टेज ड्राम्यामुळे घरातील वातावरण अक्षरशः तापल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या दिवशी टास्कमध्ये सोनालीने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे रोशन थेट अडचणीत आला आहे.

बिग बॉस मराठी सीझन ६ च्या घरात नॉमिनेशन टास्कमध्ये हाय व्होलेटेज ड्रामा पाहायला मिळत आहे. प्रत्येक सदस्याला आपले नातेसंबंध आणि खेळाची समज दाखवण्याची संधी मिळतेय. पण त्याचवेळी सोनालीने विरुद्ध रोशन असा केळ रंगला आहे. त्यामुळे सोनालीने जो रोशनविरोधात निर्णय घेतला आहे, त्याचा सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघेही आतापर्यंत एकमेकांना पाठिंबा देत होते. पण आता घरात खेळाचे समीकरणच बदलले आहे.

bigg oss marathi 6 contestant
O Romeo Shahid Kapoor | रिलीजपूर्वीच वादात सापडला "ओ'रोमियो", गँगस्टर हुसेन उस्तराच्या मुलीने मागितले २ कोटींची भरपाई

नॉमिनेशन टास्कमध्ये स्पर्धकांमधील मतभेद समोर आले आहेत. सोनालीने रोशनची पतंग कापली आणि त्याला घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केले. नॉमिनेशनसाठी 'पतंग' कापण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी सोनालीने स्पष्टपणे सांगितले की, "इतर सदस्यांच्या तुलनेत रोशनचे घरातील योगदान अत्यंत कमी आहे." त्यामु‍ळे घरात एकच खळबळ उडाली. रोशनच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले आणि घरात वादाची ठिणगी पडलेली दिसतेय.

संतापाच्या भरात रोशन सोनालीवर वैयक्तिक टीका करतो. तो म्हणतो- "शहरातील माणसांचे हेच काम असते, दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन वर जायचे. पण सोनाली म्हणते की, रोशनची गेममधील पकड कमी आहे. त्याला नॉमिनेट करणे योग्य आहे. दुसरीकडे रोशन तिला टोला लगावतो की, "आता तुमच्याकडून ट्युशन घ्यावी लागेल." 'बिग बॉस मराठी' सिझन ६ रोज रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

bigg oss marathi 6 contestant
Bigg Boss Marathi 6 | 'पॉवर की'ला हलक्यात घेणं पडलं रुचिताला भारी! तिसऱ्याच दिवशी घरात नव्या संकटाची चाहूल!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news