पुढारी ऑनलाईन डेस्क - आज रात्री बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा पाहायला मिळणार आहे. संग्राम चौगुलेची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर आता नवा टास्क समोर येत आहे. एक प्रोमो बिग बॉस मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहे. त्यामध्ये संग्राम आणि निक्की तंबोलीची बाचाबाची पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, बिग बॉस बॅकग्राऊंडला घोषणा करतात की, या विहिरीत असे काही सदस्य पडतील, जे सदस्य अपात्र आहेत..संग्राम म्हणतो की, निक्कीला पाण्यात जायचं आहे. यावर निक्की म्हणते की, मी मेडिकल कंडीशनमुळे पाण्यात उतरु शकतं नाही. यावर संग्राम म्हणतो की, बिग बॉस मी यांना पाण्यात ढकलणार आहे आणि निक्कीला तो पाण्यात ढकलतो. पाण्यातून वर आल्यानंतर निक्की संग्रामला चॅलेंज देते की, ...तर माझं नाव बदलव. यावर संग्रामचे चेहऱ्यावरील हावबाव पाहण्यासारखे आहेत.
घनश्याम दरवडेचा घरातील प्रवास संपल्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली. आल्याबरोबर त्याने धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. आता आज बिग बॉसच्या घरात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.