image of salman khan-Chitrangda Singh
Battle Of Galwan Chitrangda Singh confirm lead role Instagram

Battle Of Galwan Chitrangda Singh चित्रांगदा सिंग ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत, दिग्दर्शक अपूर्व लखिया यांची घोषणा

Battle Of Galwan Chitrangda Singh | चित्रांगदा सिंग सलमान खानसोबत ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे
Published on

Battle Of Galwan Chitrangda Singh confirm lead role

मुंबई - दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केले की, अभिनेत्री चित्रांगदा सिंग आगामी युद्धपट ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

गंभीर आणि प्रभावी कथानकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लखिया यांनी चित्रांगदाच्या अभिनयकौशल्याचे कौतुक करत तिला योग्य निवड असल्याचे सांगितले. “मी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये तिचे अभिनय पाहून खूप प्रभावित झालो होतो. ती संजीवक अभिनय आणि सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे,” असं लखिया म्हणाले. “सलमान सरांच्या मूक पण ताकदवान भूमिकेला चित्रांगदाची नाजूक पण ठाम उपस्थिती छान प्रकारे पूरक ठरणार आहे.”

image of salman khan-Chitrangda Singh
Smriti Irani Actress journey | वेट्रेस ते मॉडेल..स्मृती ईरानी कशी बनली 'इंडिया'ची आवडती 'तुलसी' बहू?

चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, लखिया अशा अभिनेत्रीच्या शोधात होते, अशी अभिनेत्री जिच्यामध्ये ताकद, भावनिकता आणि नाजूकपणा यांचा योग्य संतुलित मिलाफ असेल – आणि हे सर्व गुण चित्रांगदामध्ये सहज दिसले. विशेषतः इंडिया गेटवर घेतलेल्या तिच्या काही छायाचित्रांनी लखिया यांना भारावून टाकले, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील सहज भावभावना आणि सौंदर्य या भूमिकेची खरी प्रतिमा दर्शवत होती.

image of salman khan-Chitrangda Singh
Premachi Goshta 2 Teaser |ललित प्रभाकर-स्वप्नील जोशी-भाऊ कदमच्या ‘प्रेमाची गोष्ट २’चा टीझर प्रदर्शित

‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार असून, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news