दहावीत ८३ टक्के मिळवून ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीने ट्रोलर्सची बोलती केली बंद

Harshaali Malhotra
Harshaali Malhotra

पुढारी ऑनलाईन डेस्क : बजरंगी भाईजान फेम मुन्नी अर्थातचं हर्षाली मल्होत्राने सीबीएसआ बोर्डात ८३ टक्के गुण मिळवून सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केलीय. तिच्या रील्सवरून काही ट्रोलर्स तिच्यावर टीका करायचे. आता हर्षालीने चांगले गुण मिळवत सर्वांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सोबतचं आपला आनंद देखील फॅन्ससोबत शेअर केला आहे.

जाणून घ्या हर्षाली मल्होत्राबद्दल या गोष्टी

  • बजरंगीच्या सेटवर हर्षाली सलमानला मामा म्हणून हाक मारायची
  • बजरंगी चित्रपटाआधी तिने प्रेम रतन धन पाओ चित्रपट साईन केला होता.
  • या चित्रपटामध्ये तिची छोटी भूमिका होती
  • पण त्याआधी तिला बजरंगी भाईजान चित्रपट मिळाला
  • चित्रपटामध्ये तिला चिकन खानाताना दाखवण्यात आले आहे
  • रिअल लाईफमध्येही तिला चिकन आवडते.

काय म्हणाले होते ट्रोलर्स?

हर्षालीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये काही युजर्सनी कॉमेंट सेक्शनमध्ये आलेले काही प्रश्न शेअर केले आहेत. एका ट्रोलरने लिहिलंय-'बोर्ड्स है अभ्यास कर…रील बनवून परीक्षा पास होत नाही…कथ्थक क्लास जातेस आणि रीलचं बनवतेस.' दुसऱ्या युजरने लिहिलं-'संपूर्ण दिवस रीलचं बनवतेस का? अभ्यास करतेस की नाही.' आणखी एकाने कॉमेंट केलं, 'कथ्थक क्लास जाशील तर पास कशी होणार?'

हर्षालीने कशी केली ट्रोलर्सची बोलती बंद

त्यानंतर याच रीलमध्ये हर्षालीने गुड न्यूज शेअर करत सडेतोड उत्तर दिलं. तिला १० सीबीएसई बोर्डात ८३ टक्के गुण आले आङेत. तिने हेटर्सना थँक्यू देखील म्हटलं.

काय म्हणाली हर्षाली?

हर्षालीने कॅप्शनमध्ये लिहिलं, '…मी माझा कथ्थक क्लासेस आणि शिक्षणामध्ये योग्य संतुलन बनवण्यासाठी यशस्वी ठरले आणि परिणाम? प्रभावशाली ८३% स्कोर! कोण म्हणतं की, तुम्ही रील आणि रियल दुनिया दोन्हींमध्ये आपले पाय रोवू शकत नाही.? त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद, ज्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास केला आणि आपले अतूट समर्थन देणं कायम ठेवलं.'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news