Badshah Marries Isha Rikhi: 6 वर्षांनंतर बादशाहने पुन्हा केलं गुपचूप लग्न? इशा रिखीसोबतचे फोटो व्हायरल; सोशल मीडियावर खळबळ

Badshah Marries Isha Rikhi News: रॅपर बादशाह आणि अभिनेत्री इशा रिखी यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. व्हायरल फोटोंमध्ये दोघे पारंपरिक विधींमध्ये दिसत असले तरी अधिकृत घोषणा झालेली नाही.
Badshah Marries Isha Rikhi
Badshah Marries Isha RikhiPudhari
Published on
Updated on

Badshah Marries Isha Rikhi News: प्रसिद्ध गायक-रॅपर बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला असून, त्याने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी हिच्यासोबत गुपचूप विवाह केल्याचा दावा केला जात आहे.

या चर्चेला उधाण आलं ते इशा रिखीच्या आई पूनम यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमुळे. या फोटोंमध्ये बादशाह आणि इशा पारंपरिक लग्नाच्या जोड्यात दिसत आहेत. बादशाहने ब्राउन रंगाचा कुर्ता आणि सोबत गोल्डन साफा परिधान केला आहे, तर इशा लाल रंगाच्या पारंपरिक सलवार कमीजमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये दोघांनीही एकमेकांना हार घातलेला दिसत असून कुटुंबीयांच्या उपस्थितीत हे विधी पार पडल्याचं दिसतं आहे.

Badshah Marries Isha Rikhi
Dhurandhar 2 Ending: 'धुरंधर 2' च्या क्लायमॅक्समध्ये हमजासोबत काय होतं? आदित्य धर पार्ट 3 आणणार का?

मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान अद्याप बादशाह किंवा इशा रिखी यांच्याकडून लग्नाबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे लग्न अधिकृत आहे की केवळ अफवा, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

बादशाह आणि इशा यांचं नातं मागील चार वर्षांपासून चर्चेत आहे. दोघांची ओळख एका पार्टीमध्ये झाली आणि त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं सांगितलं जातं. इशा रिखीने 2013 साली पंजाबी चित्रपट 'जट्ट बॉईज पुट्ट जट्टन दे' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं, तर 2018 मध्ये 'नवाबजादे' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Badshah Marries Isha Rikhi
Dhurandhar 2 Box Office Collection Day 5: तुफान कमाई अन्‌ रेकॉर्ड मोडत चाललाय धुरंधर द रिवेंज, ग्लोबली कलेक्शन किती?

दरम्यान, बादशाहचा यापूर्वी जस्मिन मसिह हिच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांना एक मुलगी आहे, मात्र 2020 मध्ये त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत बादशाहने सांगितलं होतं की, त्याने नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा मुलीवर परिणाम होत असल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे बादशाह आणि इशा रिखी यांच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news