

Baaghi 4 Trailer Out
मुंबई -बहुचर्चित 'बागी ४' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. टायगर श्रॉफ, संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बाजवा यांच्या आगामी अॅक्शन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या व्हिडिओची चर्चा होऊ लागली आहे. याआधी टायगरचा असा अवतार कधीही पाहिला नसेल. तर संजय दत्तचा खलनायकी अवतारही भयानक आहे. रक्तरंजित प्रेमकहाणी म्हणून या चित्रपटाचे वर्णन केले जात आहे.
चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या अॅक्शन फ्रँचायझीची चर्चा होताना दिसतेय. बागी ४ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीजझाल्यानंतर युजर्सकडून कॉमेंट्सदेखील येत आहेत. कारण प्रेमाचं नवं रुप यामधून दिसणार आहे.
टायगर श्रॉफने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले- ''वर्षातील सर्वात रक्तरंजित प्रेमकथा येथून सुरू होते, प्रत्येक प्रियकर खलनायक असतो. बागी-४ चा ट्रेलर प्रदर्शित झाला.''
चित्रपटाचा ट्रेलर एक प्रभावी डायलॉगने ऐकू येतो. ''लव स्टोरी तो सुनी थी, पढ़ी थी, लेकिन ऐसी एक्शन-पैक लव स्टोरी पहली बार देखी। रोमियो, मजनूं, रांझा, सबको फेल कर दिया एक बागी ने.'' यानंतर टायगरचे ॲक्शन सीन्स सुरु होतात
टायगर श्रॉफ रॉनीच्या भूमिकेत, हरनाज संधू अलीशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनेक प्रभावशाली डायलॉग्जनी टायगरने आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर हरनाज संधूचा 'रॉनी मुझे भूल नहीं सकता' हा डायलॉगदेखील लक्षवेधी ठरतो.
ए. हर्ष दिग्दर्शित चित्रपट ५ सप्टेंबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. ॲक्शन, रोमान्स, इमोशन्सने भरपूर हा चित्रपट ठरणार आहे.
ट्रेलरमध्ये संजय दत्तची एन्ट्री मोठे सरप्राईज आहे. 'अजीब किस्सा देखा खुदकुशी का, दुनिया से तंग आकर एक आशिकने मोहब्बत कर ली.' हा डायलॉग त्याच्या एन्ट्रीवेळी ऐकू येतो. त्यामुळे कहाणीमध्ये काय वळण येणार, याचा प्राथमिक अंदाज बांधता येईल.