हृदयाचा ठाव घेणारे ‘अत्तर’ लघुपटाचे पोस्टर प्रदर्शित

attar film
attar film
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि रुहानी म्युझिक निर्मित असलेल्या 'अत्तर'चे नुकतेच पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 'अत्तर' खूप महत्वाची भूमिका बजावत असते. 'अत्तर' जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सुंगधाची दरवळ हेच 'अत्तर' अनेकांचे आयुष्य सुगंधी करते ते तर काही जणांच्या वाट्याला अडसर बनते. याच सुगंधी 'अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.

गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला वडिलांना द्यायची आहे. गटारात काम करणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी त्या मुलीच्या संघर्षाची कहाणी 'अत्तर' या लघुपटात मांडण्यात आली आहे. यामध्ये बालकलाकाराच्या प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे आपल्याला पाहावयास मिळणार आहे. या अगोदर आपल्याला मीरा ही अभिनेत्री निवेदिता सराफ आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासोबत जाहिरातीमध्ये काम करताना दिसली होती. त्याचबरोबर अभिनेत्री रेवा बर्गे, पुरुषोत्तम बाबर, विनय सोनवणे, रमेश साठे असे कलाकार आहेत.

अत्तर या लघुपटाची निर्मिती राजू लुल्ला, रुपाली मोटे, कॅमेरामन – अथर्व नगरकर, आकाश भापकर, संगीत – ओमकार रणधीर, कथा पटकथा संवाद – रामकुमार शेडगे, संकलन / डी. आय विनोद राजे, गौरवराज अडप, अजय भोसले, वेशभूषा – मधुरा शेडगे यांनी केले आहे. याचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी केले असून शेडगे यांनी या अगोदर बहुचर्चित आणि मल्टीस्टार असलेल्या अ. ब. क या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. द ट्रॅप, मसूरची ऐतिहासिक यशोगाथा आणि इतर प्रोजेक्ट लवकरच रसिकांच्या भेटीस येणार आहेत. तर अत्तर जगभरातील अनेक लघुपट महोत्सवामधील स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news