पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटपटू के. एल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर Athiya Shetty-KL Rahu दोघे कपल कधी लग्न करतात? याकडे चाहत्याचे लक्ष लागले होते. याच दरम्यान दोघांच्या लग्नाची डेट, ठिकाण, विधीची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल यांनी मुंबईतील बांद्रा अपार्टमेंटंमध्ये स्पॉट झाले होते. याशिवाय हे कपल अनेक वेळा नाईट पार्टीत, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये देखील पाहिलं गेलं आहे. यानंतर मात्र, चाहत्यांनी दोघा कपलच्या डेट आणि लग्नाची जोरदार चर्चा सुरू केल्या. खूप दिवसांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, अथिया शेट्टी आणि के. एल राहुल एकमेकांसोबत नव्या आयुष्याची सुरूवात सज्ज झाले आहेत. दोन्ही कुंटूबियाकडून लग्नातील डेकोरेशन, आमंत्रित करण्यात येणाऱ्या मान्यवरांची यादी, ठिकाण आणि इतर यासर्व गोष्टीची जमवाजमव करण्यास सुरूवात झाली आहे. अथिया आणि केएल राहुल पुढच्या वर्षी २०२३ रोजी जानेवारी महिन्यात हे कपल लग्न करणार आहे.
याच दरम्यान अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी त्याच्या खंडाळा येथील 'जहाँ' बंगल्यात सजावटीची जोरदार तयारी केल्याने हा विवाह सोहळा तेथे पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल्स सोडून अथिया आणि राहुलचा विवाह निसर्गरम्य खंडाळ्यात होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच २०२२ च्या T२० विश्वचषक स्पर्धेनंतर काही महिन्यांत हे जोडपे लग्न बंधनात अडकणार आहेत.
अथिया आणि केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही एकमेकांच्या फोटोवर कॉमेन्टस करून प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघेही सतत सोशल मीडियावर सक्रीय असतात. अथिया आणि केएल राहुल यांनी अधिकृतपणे त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही, परंतु, त्यांचे एकमेकांवरील प्रेम सर्वश्रुत झाले आहे. यामुळे चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचलंत का?