Asha Bhosle Funeral |स्वरांजली! सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्वात विलीन.. शिवाजी पार्कवर साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Asha Bhosle Funeral |स्वरांजली! सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्वात विलीन.. शिवाजी पार्कवर साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
Asha Bhosle
Asha Bhosle Last Rites pudhari photo
Published on
Updated on
Summary

भारतीय संगीत क्षेत्रातील धगधगतं नक्षत्र असलेल्या आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या 'आशाताईंना' अखेरचा निरोप देण्यासाठी केवळ सामान्य जनताच नव्हे, तर चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. हेलन, जॅकी श्रॉफ, सचिन तेंडुलकर, तब्बू, गायक शान, अभिनेता नील नितीन मुकेश व सुदेश भोसले, विकी कौशल, आमीर खान यांसारख्या कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहून त्यांना अखेरचा निरोप दिला.

सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्वात विलीन झाल्या. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय इतमामात पोलिसांकडून बंदुकींच्या फैरींची सलामी आणि मानवंदना देण्यात आली.

मिलिंद देवरा, आमीर खान, विकी कौशल, अनु मलिक, अनुप जलोटा, विवेक ओबेरॉय, गायक शान, हरिहरन, आशुतोष शेवाळकर, असे अनेक बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील, कला-राजकीय क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रिटी यावेळी उपस्थित आहेत.

सुदेश भोसले, अनुप जलोटा, शान यांनी गाणी गायली. 'प्यार के मोल पर छोडोगे बाते मेरी' हे गाणे गायक शान यांनी गायलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भूजबळ, शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज ठाकरे, स्मशानभूमीत उपस्थित झाले. यावेळी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह आणि नागरिकांच्या गर्दीत अंत्ययात्रा काढण्यात आली होती. आठ दशकाहून अधिक काळ संगीत क्षेत्र गाजवणाऱ्या आशाताईंनी या जागातून कायमचा निरोप घेतल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Asha Bhosle
Asha Bhosle Passes Away: भारताच्या रेनेसाँस युगाचा शेवट... राज ठाकरेंची आशा भोसलेंना भावनिक श्रद्धांजली

आशा भोसले यांना सलामी

राजकीय सन्मान अंतर्गत आशा भोसले यांचे पार्थिव तिरंग्यामध्ये लपेटले. त्यानंतर त्यांना सलामी देण्यात आली. सकाळी साडे १० वाजल्यापासून आशा भोसले यांचे अंत्यदर्शन सुरू करण्यात आले. मुंबईतील घरात त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

अभिनेत्री हेलन यांनी मुंबईतील आशा भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन, दिग्गज गायिका आशाताईंना अंतिम अभिवादन केले.

Asha Bhosle
Asha Bhosle|"दीदी तुझे सूर कच्चे वाटतात...", जेव्हा आशा भोसले यांनी लतादीदींनाच टोकलं होतं; जाणून घ्या 'तो' खास किस्सा

अभिनेता जॅकी श्रॉफने मुंबईतील निवासस्थानी जाऊन, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ए.आर. रहमान, आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

अभिनेत्री तबूने आशाताईंच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. उदित नारायण, रणवीर सिंह, रितेश देशमुख यांनीही आशाताईंना श्रद्धांजली वाहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news