

पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री कंगना रनौत यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे खूप कौतुक केलेले आहे. शाहरुखने १९ नोव्हेंबर रोजी आर्यन दिग्दर्शक म्हणून डेब्यू केल्याची घोषणा केली. आर्यन एका बॉलीवूड सीरीजचे दिग्दर्शन करणार आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. (Aryan Khan - Kangana Ranaut)
दरम्यान, कंगना रनौत यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे कौतुक केले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं, "हे खूप चांगलं आहे की, फिल्मी परिवारातील मुले केवळ मेकअप करणे, वजन कमी करणे, नटणे आणि स्वत:ला अभिनेता समजून घेण्याच्या पुढे गेले जात आहेत." (Aryan Khan - Kangana Ranaut)
त्यांनी पुढे लिहिलं, "आम्हाला सामूहिक पद्धतीने भारतीय चित्रपटातील मानके उंचावली पाहिजेत. कारण ही वेळेची मागणी आहे. ज्यांच्याकडे संसाधने असतात, ते नेहमी सर्वात सोपे मार्ग अवलंबतात. आम्हाला कॅमेरांच्या मो आणखी लोकांची गरज आहे. गे चांगलं आहे की, आर्यन खान या मार्गावर जात आहेत. मी एक लेखिका आणि चित्रपट निर्मात्याच्या रूपात त्यांच्या डेब्यूची प्रतीक्षा करत आहे."
मंगळवारी शाहरुखने एक्सवर एका पोस्टमध्ये आर्यन खानने दिग्दर्शनाची सुरुवात केल्याचे वृत्त शेअर केले आहे. "हा एक खास दिवस आहे, जेव्हा प्रेक्षकांच्या समोर एक नवी कहाणी सादर केली जात आहे. आज आणखी खास आहे कारण की, @RedChilliesEnt आणि आर्यन खान @NetflixIndia वर आपली नवी सीरीज दाखवण्यासाठी प्रवासावर निघाला आहे. येथे अदम्य कहाणी, नियंत्रित अराजकता, साहसी दृश्ये आणि खूप सारी मस्ती आणि भावना आहेत. पुढे जा आणि लोकांचे मनोरंजन करा, आर्यन, आणि लक्षात ठेव, शो बिझनेससारखा कोणताही बिझनेस नाही!!"