Archita Phukan: 25 लाख मोजून वेश्या व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर पडलेली इन्फ्लुएंसर कोण?

Archita Phukan Background: आसामची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चिता फुकन जिला बेबी डॉल अर्चि म्हणून देखील ओळखले जाते
Archita Phukan
Archita PhukanPudhari
Published on
Updated on

Who Is Archita Phukan

मुंबई : आसामची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चिता फुकन जिला बेबी डॉल अर्चि म्हणून देखील ओळखले जाते. अर्चिताने नुकताच एक खुलासा केला ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान अर्चि सगळ्यात आधी प्रकाशझोतात आली ती तिच्या आणि अमेरिकन अडल्ट स्टार केंड्रा लस्ट हिच्यासोबतच्या फोटोमुळे.

या दोघीही एकत्र आल्या आणि सोशल मिडियावर रिएक्शनचा पाऊस पडला. अर्चि मशिगनमध्ये असताना तिची आणि केंड्राची भेट झाली होती त्या दरम्यानचा हा फोटो व्हायरल होतो आहे. काहीनी या फोटोचे कौतुक करत अर्चिने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याचे म्हटले आहे तर काहींनी ही आता अडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाणार असल्याचे बोलत तिच्यावर टीका केली आहे. यावर अर्चिने ट्रोलर्सना खरमरीत उत्तर दिले आहे. ती म्हणते. ‘लोक खूप लवकर जज करतात. मी अजून याच्यावर काहीच व्यक्त केले नाही. कुणाला काय वाटेल ते विचार करोत मी माझे खरेपण जाणून आहे.

कोण आहे बेबी डॉल अर्चि फुकन?

अर्चि फुकन ही आसामी एन्फ्लूएन्सर आहे. जिचे इंस्टाग्रामवर 6.8 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंचे सोशल मिडियावर अनेक चाहते आहेत. 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू टीमला सपोर्ट केल्यामुळे ती प्रकाशझोतात आली होती. गेल्या दोन दिवसांपासून गुगल ट्रेंड्समध्येही अर्चिता फुकन हे सर्वाधिक सर्च केलेल्या कीवर्डमध्ये आहे.

भूतकाळातील शहारे आणणाऱ्या आठवणी

या सगळ्यादरम्यान तिने तिच्या भूतकाळातील अनुभवाबाबत शेयर केले आहे.यामध्ये ती म्हणते, ‘ मी कोणेएके काळी वेश्यावस्तीचा हिस्सा होते. हा काळ छोटा मोठा नव्हता तर जवळपास सहा महिन्यांचा होता. अर्थात मला जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडले होते.

या दलदलीतून सुटका करून घेण्यासाठी मला 25 लाख रुपये मोजावे लागले होते. जसे की मी माझे स्वातंत्र्य विकतच घेतले होते’. अर्चिने ही आपबीती सोशल मीडिया पोस्टद्वारे शेयर केली होती. पुढे ती म्हणते, ‘ आज मी जेव्हा माझा त्रासदायक भूतकाळ पाहाते. तेव्हा मी स्वतला एका उदाहरण म्हणून पाहते आहे. जे ठरवले तर काहीही करू शकतो याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.’

Archita Phukan
Panchayat Season 5: पंचायत 5 साठी तयार आहात? मेकर्सनी जाहीर केली नव्या सीझनची तारीख

इतरांचीही सुटका

अर्चि नवी दिल्लीतील जी. बी रोड येथे असलेल्या वेश्यावस्तीत सहा वर्षे होती. तिने एका संघटनेच्या माध्यमातून तिच्यासह 8 इतर मुलींचीही वेश्याव्यवसायातून सुटका केली. याशिवाय यातून बाहेर आल्यानंतर या मुलींनी योग्यप्रकारे जीवन जगावे यासाठीही तिने प्रयत्न केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news