अमोल आजारातून शाळेत परतल्यावर करावा लागला छेडखानिचा सामना

Appi Aamchi Collector | अमोल आजारातून शाळेत परतल्यावर करावा लागला छेडखानिचा सामना
Appi Aamchi Collector
अमोल आजारातून शाळेत परतल्यावर करावा लागला छेडखानिचा सामनाInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत सर्व आपल्या दैनंदिन दिनचर्येवर परत आले आहेत आणि अमोलच्या आजारनंतर तो पहिल्यांदा शाळेत जायला लागला आहे. संपूर्ण कुटूंब त्याला मदत करण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्यांची वाटणी करतात. अमोलचे त्याचे मित्र शाळेत घेऊन जाण्यास येतात, आणि सर्वाना तो सामान्य जीवन जगताना बघून खूप आनंद होतो. मात्र शाळेत काही मुलं अमोलला केस नसण्यावरून चिडवतात. हे पाहून अमोलचे मित्र रागावतात, पण अमोल शांतपणे सर्वांना खेळ सुरू ठेवायला सांगतो.

अमोल आणि त्याचे मित्र तो खेळ जिंकतात. घरातले शाळेतील छेडछाड संदर्भातील घटना ऐकतात आणि काळजी करतात. रुपाली अमोलला होमस्कूलिंग करण्याचा सल्ला देते. पण अप्पी आणि अर्जुन त्याच्या विरोधात आहेत, कारण त्यांचा विचार आहे की शाळेचे शिक्षण अमोलच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. ते अमोलच्या शाळेला भेट देण्याचा निर्णय घेतात. इकडे एका सूत्राच्या टिपनुसार अर्जुन एका गोदामात धाड टाकतो, जिथे बालमजुरी करणाऱ्यांना फसव्या ओळखपत्रांखाली राबवलं जात आहे. तो आरोपींना अटक करून त्या लहान मुलांना मुक्त करतो. ते गोदाम एका प्रतिष्ठित राजकारण्याचे आहे, ज्यामुळे त्याचा राग अनावर होतो.

सुरुवातीला तो अर्जुनला लाच देण्याचा प्रयत्न करतो पण नकार मिळाल्यावर तो राजकारणी अर्जुनला धमकावतो. यात अप्पी- अर्जुनच्या बाजूने ठामपणे उभे आहे आणि सत्य समोर आणण्याच्या त्याच्या निर्णयास पाठिंबा देते. राजकारणी प्रतिशोध म्हणून रात्री अप्पी आणि अर्जुनच्या घरात गुंड पाठून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, पण अर्जुन त्यांना पकडतो आणि त्यांचा कट फसतो. ही घटना कुटुंबाला हलवून टाकते, पण ते अप्पी आणि अर्जुनला विनंती करतात की, अमोलसाठी त्यांचा आपला लढा थांबवावा.

आता अप्पी- अर्जुन आपली सत्याची लढाई थांबवतील का? यासाठी बघायला विसरू नका 'अप्पी आमची कलेक्टर' सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६:३० वा. झी मराठीवर पाहता येईल.

Appi Aamchi Collector
Ishika Taneja | 'या' अभिनेत्रीने बॉलिवूडला म्हटलं अलविदा, बनली साध्वी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news